एखाद्या तानसेनलाही मागे टाकेल, असे या मुलाचे सूर आणि हावभाव, पाहा हा व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हीडीओ व्हायरल होतच असतात. काही कॅामेडी, तर काधी सुंदर दृश्य तर, कधी एखादं गाणं यासारख्या गोष्टी नेहमीच सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत असतात.

Updated: May 3, 2021, 09:31 PM IST
एखाद्या तानसेनलाही मागे टाकेल, असे या मुलाचे सूर आणि हावभाव, पाहा हा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हीडीओ व्हायरल होतच असतात. काही कॅामेडी, तर काधी सुंदर दृश्य तर, कधी एखादं गाणं यासारख्या गोष्टी नेहमीच सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत असतात. हे व्हिडीओ लोकांचे मनोरंजन तर करतातच परंतु त्याच बरोबर ते काही लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याचे कारणही बनतात. असाच एका लहान मुलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याचे गाण्यातील सुर पाहूण लोक दंग झाले आहेत. त्याचा गोड आवाज सर्वांना वेड लावत आहे.

सध्या एका छोट्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये तो लहान मुलगा त्याच्या गुरूच्या संगनमताने गाण्याचा रीयाज करत आहे. हा मूलगा आपल्या गुरूबरोबर 'या नवल नयनों' हे गाणे गात आहे. त्याचवेळी, त्याच्यासोबत बसलेली व्यक्ती त्या मुलाला हार्मोनियमच्या स्वरात गाणे शिकवित आहे.

या मुलाचे गाणे केवळ लोकांना वेड लावत नाही आहे तर, त्याचा अभिनय आणि त्याच्या चेहऱ्यावरी हावभाव लोकांना फार आवडला आहे. याच कारणामुळे लोकं स्वत:ला हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्यापासून आणि शेअर करण्यापासून रोखू शकत नाही. तो हे गाणे अशा पद्धतीने गात आहे की, जणू तो एखादा संगीत मास्तर आहे.

या मुलाचे हार्मोनियमवरील​हे गाणे ऐकल्यावर मोठे मोठे 'तानसेन' अपयशी ठरतील असे तुम्हाला वाटेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडीओ केवळ आवडतच नाही आहे तर यावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येत​ आहेत.