Viral Video: जंगल सफारी (Jungle Safari) करायला आवडते का? असं कोणी विचारलं तर तुम्ही हो असंच उत्तर द्याल. जंगलात जिवंत प्राण्यांना पाहणं प्रत्येकालाच आवडतं. जंगल सफारीच्या माध्यमातून हा अनुभव घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हा अनुभव घेताना सुरक्षेचा काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या जिवावरही बेतू शकतं. पश्चिम बंगालमधील (West Bengal) अशीच एक घटना समोर आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. जंगलात सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या जीपमागे गेंडा (Rhinos) लागल्याने झालेल्या दुर्घटनेत 7 पर्यटक जखमी झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पश्चिम बंगालच्या जलदापरा नॅशनल पार्कमध्ये (Jaldapara National Park) काही पर्यटक सफारीसाठी गेले होते. गेंडे दिसल्याने पर्यटक फोटो काढण्यासाठी थांबले होते. यावेळी गेंडे अचानक झुडपातून बाहेर येतात आणि पर्यटकांच्या जीपचा पाठलाग सुरु करतात. गेंडा आपल्या दिशेने येत असल्याने जीपचा चालक गाडी रिव्हर्समध्ये मागे पळवण्याचा प्रयत्न करतो. पण मागे खड्डा असल्याचं त्याच्या लक्षात येत नाही. यामुळे जीप पर्यटांकसह खाली कोसळते.
दुसऱ्या जीपमध्ये असलेल्या एका पर्यटकाने हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसत आहे. व्हिडीओत जीप पर्यटकांसह कोसळतान दिसत आहे. यानंतर तिथे एकच गोंधल आणि आरडाओरड सुरु होते.
भारतीय वनसेवा अधिकारी (Indian Forest Services officer ) आकाश दीप बाधवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे. यावेळी त्यांनी वन्यजीव सफारींमध्ये सुरक्षेचे नियम लागू करण्याची गरज व्यक्त केली आहे. तसंच सफारी आता साहसी खेळ बनत आहेत अशी खंतही व्यक्त केली. "देशभरातील वन्यजीव सफारींमध्ये साहसी खेळांमधील सुरक्षा आणि बचावासाठीची मार्गदर्शक तत्वं लागू करण्याची ही वेळ आहे. सफारी हे आता साहसी खेळ बनत आहेत," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I think it’s about time guidelines for safety and rescue in adventure sports are implemented in wildlife safaris across the country. Safaris are becoming more of adventure sports now!
Jaldapara today! pic.twitter.com/ISrfeyzqXt— Akash Deep Badhawan, IFS (@aakashbadhawan) February 25, 2023
पीटीआयच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत सात पर्यटक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला असून वन्यजीव सफारींमध्ये आता नियमावली असण्याची गरज बोलून दाखवली आहे. आपण जे काही निसर्गाला देतो, ते निसर्ग आपल्याला परत देतो असं एका युजरने लिहिलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं?