मुंबई : अनेक वेळा आपण अशा रागाच्या भरात अशा काही चुका करतो की, त्यानंतर आपल्याला काही काळानंतर पश्चाताप होतो. जर तुम्ही रस्त्यांवरील नियमांचे पालन केले नाही, तर तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागेल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे पाहिले जाऊ शकते, ज्यात काही दिल्ली नागरी संरक्षण कर्मचारी रस्त्यावर उभे आहेत आणि तेव्हाच रस्त्याच्या मधोमध एक उंच माणूस येतो. जो खूप रागावलेला आहे. एवढेच नाही तर तो नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांशी भांडण करतो आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन देखील करतो.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये, असे दिसून येत आहे की, एक व्यक्ती नागरी संरक्षणासाठी रस्त्यावर उभे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करण्यास सुरुवात करतो. त्याच्या वागणूकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे, परंतु या प्रकरणाबद्दल कोणाकडेही पूर्ण माहिती नाही.
मात्र, व्हिडीओच्या कमेंट बॉक्समधील काही लोकांचे म्हणणे आहे की त्या व्यक्तीने मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे दिल्लीतील या सिव्हिल डिफेन्समधील लोकांनी त्याला जेव्हा मास्क न घालण्याबद्दल प्रश्न विचारला असता, तो व्यक्ती त्यांच्यावर चिडला आणि हाणामारी करण्यावर उतरला.
व्हिडीओ पाहिल्यानंतर, कमेंट सेक्शनमध्ये लोक म्हणतात की, त्या व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत असं वागायला नको हवं होतं. या व्हिडीओमध्ये ती व्यक्ती 'मी तोडून ठेवीन' असे म्हणताना देखील ऐकलं जात आहे.
हा व्हिडीओ सौरभ पाल नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे आणि त्याला जवळपास 6 लाखाहून अनेक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओला 17 हजार लाईक्स मिळाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगू की, एका यूजरने लिहिले, 'हे पोलीस नाहीत, ते दिल्ली सिविल डिफेंसमधील लोक आहेत, ते मास्क न घालण्यासंदर्भात बोलत आहेत.'