Viral Video: आई, तशी लेक... चिमुकलीची गायकी पाहून नेटकरी देतायत दाद

हे गाणं गात असताना ही मुलगी  गाण्यात पूर्णपणे हरवून गेली आहे आणि सराईत गायकासारखी ती गाताना दिसत आहे.  सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे . 

Updated: Aug 25, 2022, 01:36 PM IST
 Viral Video: आई, तशी लेक... चिमुकलीची गायकी पाहून नेटकरी देतायत दाद title=

VIRAL VIDEO ON SOCIAL MEDIA: सोशल मीडियावर नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातले बरेच व्हिडीओ चांगलेच फेमस होत असतात,पहिले जातात आणि शेअर  केले जातात ,
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

आई हे मुलांची पहिली शिक्षक असते असं म्हटलं जात आणि ते खर्च आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला आईपासून शिकायला मिळतात . म्हणूनच आईला सर्वात श्रेष्ठ दर्जा दिला गेलाय. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चिमुरडी आणि तिची आई दिसतेय.

आईच्या हातात वाद्य दिसत आहे आणि तिच्या बाजूला तिची लेक बसलीये,खरी गंमत पुढे आहे.चिमूरडीची आई यात RANBEER आणि DEEPIKA च्या TAMASHAA सिनेमातील 'अगर तुम साथ हो' (AGAR TUM SATH HO SONG)हे गाणं गाताना दिसत आहे.

आणि बाजूला बसलेली चिमुकली आपल्या आईला गाणं गाण्यात साथ देतेय,नुसती साथ नाही तर ही चिमुरडी आईसोबत सुरात सूर मिसळून उत्तमरीत्या गाणं गातेय .. 

गाणं तर सुंदर गातच  आहे पण खरी चर्चा होतेय तिच्या हावभावांची हे गाणं गात असताना ही मुलगी  गाण्यात पूर्णपणे हरवून गेली आहे आणि सराईत गायकासारखी ती गाताना दिसत आहे. 
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे .