चालत्या गाडीमधून चोरांची हातसफाई, व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावतील

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सामानाने भरलेली गाडी रस्त्यावरुन चालत आहे.

Updated: Mar 20, 2022, 10:37 PM IST
चालत्या गाडीमधून चोरांची हातसफाई, व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावतील title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपले मनोरंजन करतात. परंतु बऱ्याचदा आपल्याला असे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका चोरीचा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये चालत्या गाडीमधून हे चोर चोरी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून पोलिस देखील चक्रावतील. चोरांची अशा प्रकारे चोरी करण्याची ही पद्धत फारच वेगळी आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सामानाने भरलेली गाडी रस्त्यावरुन चालत आहे. तेव्हा त्याच्या मागे एक बाईक देखील आहे. ज्यावर दोन व्यक्ती बसले आहेत. तर आणखी एक व्यक्ती त्या चालत्या गाडीच्या मागे चढून त्यामधील सामान एक-एक करुन काढायला सुरूवात करतो.

गाडीवर चढलेला हा व्यक्ती सामान काढून बाईकवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात देत आहे. हा प्रकार तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

हा व्हिडीओ जर त्या गाडीवाल्या पर्यंत पोहोचला नाही, आपल्या गाडीतलं सामान कुठे आणि कधी गायब झालं हे त्याला कदाचित कळणार देखील नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ swami_7773 अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मात्र 'या' प्रकाराबाबात पोलिसात तक्रार दाखल झाली की नाही किंवा त्या चोरांना पकडलं गेलं की, नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु या चोरांनी ज्या प्रकारे चोरी केली आहे. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ज्यामुळे या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत.