भर रस्त्यात खुर्ची टाकून बेवड्यांची पार्टी, एकाने भरला पेग अन् दुसऱ्याने... पाहा मजेशीर Video

Alcohol drinkers Funny Video: रस्त्यात दोन बेवड्यांनी ट्राफिक जाम केलं. पहिल्या बेवड्याने खुर्ची उचलली अन् पेग भरला, त्यानंतर जे काही झालं...

Updated: Nov 12, 2022, 07:01 PM IST
भर रस्त्यात खुर्ची टाकून बेवड्यांची पार्टी, एकाने भरला पेग अन् दुसऱ्याने... पाहा मजेशीर Video title=
Alcohol drinkers Funny Video

Viral Video : सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांना विविध गोष्टी देखील माहिती होतात. तर अशा व्हिडीओमुळे अनेकाचं मनोरंजन देखील होतं. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे दोन बेवड्यांच्या (Alcohol drinkers Funny Video) अनेकजण पोटधरून हसू लागले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

ग्वाल्हेर शहरातील (Gwalior Police Station) कोतवाली पोलीस स्टेशन हद्दत ही घटना घडली. दौलतगंज मार्केटमध्ये (Daulatganj Market) रस्त्यात दोन बेवड्यांनी ट्राफिक जाम केलं. पहिल्या बेवड्याने खुर्ची उचलली आणि वाहत्या रस्त्याच्या मध्यभागी आणून ठेवली. त्यानंतर तो खुर्चीवर ऐटीत जाऊन बसला. दुसरा बेवडा हातात दारूची बॉटल घेऊन आला.

आणखी वाचा - viral काश्मीरच्या थंडीत भारतीय जवानांचा 'kala chashma' गाण्यावर तुफान डान्स परफॉर्मन्स

दुसऱ्या बेवड्याने बॉटल हातात घेऊन पेग बनवू (Drinking Wine) लागला. त्यानंतर दोघांनी तो पेग संपवला. तो पेग प्यायल्यानंतर बराच वेळ बेशुद्ध पडून राहिला. यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेवड्यांचा अडथळा दूर केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांची समजूत घालती आणि त्यांना सोडून दिलंय. मात्र, बेवड्यांनी भर रस्त्यावर केलेल्या नाट्याने अनेकांचं मनोरंजन झालं. याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Amazing Video) होताना दिसतोय.