लग्नात सर्वांसमोर मित्राला असा आहेर कधीच देऊ नका...नवरीने रडावं की हसावं आता?

लग्न म्हटलं की, देवाण घेवाण ही होतेच. कपडे, भांडी, वस्तू आणि आहेर हे सगळं लग्नातले आकर्षण आहेत.

Updated: Jun 9, 2021, 08:44 PM IST
लग्नात सर्वांसमोर मित्राला असा आहेर कधीच देऊ नका...नवरीने रडावं की हसावं आता?

मुंबई : लग्न म्हटलं की, देवाण घेवाण ही होतेच. कपडे, भांडी, वस्तू आणि आहेर हे सगळं लग्नातले आकर्षण आहेत. त्याच बरोबर लग्नात लोकांचे रुसवे फुगवेही येतात. तसेच लग्नात मजा मस्करीही तितकीच चालते. यामध्ये वधू वराचे मित्र त्यांची मजा घ्यायचे कधीच सोडत नाही. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावती व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नवरदेवाचे मित्र दोघांचीही मजा घेत आहेत.

व्हीडिओत तुम्ही पाहू शकता की, नवऱ्याचे मित्र नवरा-नवरीला आहेर म्हणून, एक अशी वस्तू देतात जी पाहून नवरी इतकी लाजते की, तिला काय करावे हेच सुचत नाही. खरेतर मित्रांनी नवरा-नवरीला आहेर म्हणून जी वस्तू दिली ती आहे लाटणी आणि चिमटा.

हा आहेर देताना सगळे मित्र नवरा-नवरीला देताना फोटो काढत होते. त्यामुळे नवरी थोडी गांगरली. परंतु हा आहेर मजेदारही आहे त्यामुळे नवरीला तिचे हसू देखील आवरले नाही. हा आहेर पाहिल्यानंतर तिथे उपस्थित सगळेच लोकांना नंहसू आवरले नाही आणि सगळेच लोकं जोर जोरत हसू लागले.

official_niranjanm87 नावाच्या अकाउंटवरुन हा व्हीडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड करण्यात आला आहे. त्यानंतर या व्हीडिओला अनेक लोकांकडून शेअर केले गेले आहे. खरेतर या मित्रांनी हा आहेर म्हणजेच लाटणं आणि चिमटा दिला, तोन नक्की स्वयंपाकघरात वापरायला दिला की, नवऱ्याला मारायला? हे काही कळायला मार्ग नाही. पण काहीही असो या व्हीडिओमुळे लोकांच्या चेहऱ्यावरती हसु मात्र नक्की उमटवले आहे.