Viral Video : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करतात. पण जीव वाचवणारे हेच डॉक्टर रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या जीवावर उठल्याची एक घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमधल्या (Medical College) ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली. मारहाणीच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापाकांनी तीन डॉक्टरांना निलंबित केलं. तर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पाच डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेषच्या मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये (Meertu Medical College) रुग्णाच्या नातेवाईकांसोबत मारहाणीची ही घटना घडली आहे. मेडिकल कॉलेजमधल्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली, यात महिलांनाही सोडलं नाही. मारहाणी दरम्यान एक छोटा मुलगा जोरजोरात रडत आपल्या पालकांना मारू नका अशी विनंती डॉक्टरांना करत असल्याचं या व्हिडिओ दिसतंय.
पाच वर्षांचा आजारी मुलाच्या उपचारासाठी मुलाचे नातेवाईक मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये आलं होतं या मुलाच्या अंगठ्याचं हाडं तुटलं होतं. पण काही कारणाने रुग्णाचे नातेवाईक आणि ज्यूनिअर डॉक्टरांमध्ये वादावादी झाली. याचं पर्यावसन हाणामारीत झाली. ज्या डॉक्टरबरोबर वाद झाला त्याने इतर डॉक्टरांना बोलावून घेतलं आणि त्या पाच वर्षांच्या मुलाच्या नातेवाईकंना मारायला सुरुवात केली. काही डॉक्टरांनी महिलांनाही सोडलं नाही. इतकंच नाही तर त्यांच्या हातातील मोबाईल जमिनीवर आपटत ते फोडून टाकले.
महिलांचे केस पकडून त्यांनी जमिनीवर आपटलं. घटनेच्यावेळी रुग्णालताली एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हा सर्व प्रकार कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेरठ मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. आर सी गुप्ता यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तीन ज्यूनिअर डॉक्टरांना तात्काळ निलंबित केलं. या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीचीह स्थापना करण्यात आली आहे.
मेरठ :- मेडिकल कॉलेज के जूनियर डॉक्टरों की गुंडई, 5 साल के बच्चे को लेकर आये परिवार को पीटा
चारा मशीन में आने से कट गया था बच्चे का हाथ
इलाज छोड़कर पूरे परिवार को डॉक्टरों ने पीटा
परिवार की पिटाई के दौरान बिलखता रहा बच्चा
पिटाई से परिवार की एक महिला बेहोश हुई
1/2 @JantantraTv pic.twitter.com/2f14Jb6TMo— अरुण चन्द्रा (@vipchandra13) October 24, 2023
मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये मारहाणीची ही पहिली घटना नाहीए, याआधीसुद्धा ज्यूनिअर डॉक्टर्सने रुग्णांना मारहाण केल्याची घटना घडली होती. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी आरोपी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्युनिअर डॉक्टरांना 60 वर्षांची वृद्ध महिला आणि एका गर्भवती महिलेलाही मारहाण केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.