सिंहाच्या हल्ल्यामुळे झेब्रा भडकला; त्यानंतर जे झालं ते आयुष्यभर सिंह ठेवणार लक्षात

झेब्रा आणि सिंहाचा भयानक व्हिडिओ वायरल...

Updated: Dec 1, 2021, 04:37 PM IST
सिंहाच्या हल्ल्यामुळे झेब्रा भडकला; त्यानंतर जे झालं ते आयुष्यभर सिंह ठेवणार लक्षात

  मुंबई : जंगलात मानवच नाही तर प्राणीही सुरक्षित नाहीत. त्याच्या मृत्यूचा धोका नेहमीच असतो. जंगलात एखादा प्राणी नेहमी दुसऱ्या प्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. शिकारीदेखील कधीतरी स्वतःच बळी ठरतो. अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी अशक्त प्राणी शिकारी प्राण्यांशी भिडतात. यात त्यांना जीव गमवावा लागला तरी चालेल.

सिंहाचा झेब्रावर हल्ला
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिंह झेब्रावर हल्ला करताना दिसत आहे. या हल्ल्यानंतर झेब्राला इतका राग आला की जंगलाचा राजाही अस्वस्थ झाला.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणू शकाल की, जेव्हा आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते तेव्हा दुर्बलही बलवान होतात.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जंगलात शिकार शोधत सिंह झेब्राजवळ येतो. सिंह त्यावर हल्ला करतो. मात्र, आता आपला जीव वाचणार नाही. असे झेब्राला वाटू लागले, तेव्हा तो संतापून सिंहाला प्रत्युत्तर देतो.

'जंगलचा राजा' झेब्राला घाबरला.
सिंह झेब्राची मान पकडून त्याला जमिनीवर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे, झेब्रा त्याच्या सर्व शक्तीने मान दुसरीकडे वळवतो. तो असे करतो की जंगलाचा राजा सिंह जमिनीवर पडतो. मात्र, सिंहदेखील पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने झेब्राची मान पकडतो. यानंतर दोघांमध्ये हाणामारी होते. व्हिडिओ पहा-

आपण पाहू शकता की एक वेळ येते जेव्हा झेब्रा उठतो आणि सिंहाला मारायला लागतो. यामुळे सिंह घाबरतो. सिंह झेब्राची मान सोडत नाही. तरी तो पूर्ण ताकदीने धावू लागतो.

त्यामुळे झेब्रासोबत सिंहही ओढला जातो. झेब्रा इतका रागावलेला दिसतो की जर तो सुटला तर सिंहालाच मारून टाकेल. या दोघांमध्ये बराच वेळ भांडण चालते आणि शेवटी जंगलाच्या राजाला धक्का देऊन झेब्रा पळून जातो.

@Animal_World नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.