फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयानंतर ट्विटरवर सेलिब्रिटिंच्या प्रतिक्रियांचा पाऊस...

सोमवारी सुप्रीम कोर्टानं दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 

Updated: Oct 11, 2017, 06:05 PM IST
फटाक्यांवरील बंदीच्या निर्णयानंतर ट्विटरवर सेलिब्रिटिंच्या प्रतिक्रियांचा पाऊस...  title=

नवी दिल्ली : सोमवारी सुप्रीम कोर्टानं दिवाळीच्या मुहूर्तावर दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फटाक्यांवर बंदीचे आदेश दिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. 

क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं लोकांना 'रिट्विट... जर तुम्ही यंदा दिवाळी एक्स्ट्रा धूम-धाम से सेलिब्रेट करणार असाल तर...' असं म्हणत लोकांना आवाहन केलंय. सेहवाग कोर्टाच्या या निर्णयानं नाराज झालाय का खुश झालाय? हे मात्र ट्विटरवासियांना समजायलं कठिण जातंय.  

क्रिकेटर युवराज सिंहनं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं स्पष्टपणे स्वागतचं केलंय. यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यानं नागरिकांना केलंय. 

सुप्रीम कोर्टानं सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी लावण्याचा निर्णय दिलाय. कोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत आपल्या आदेशात म्हटलंय की १ नोव्हेंबर २०१७ पर्यंत दिल्ली - एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री होणार नाही. कोर्टाच्या आदेशानुसार, १२ सप्टेंबरचा जुना आदेश १ नोव्हेंबरपासून लागू होईल. कोर्टाच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबरनंतर काही अटींसहीत दिल्ली - एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री केली जाऊ शकेल.

महत्त्वाचं म्हणजे, या बंदीसहीत कोर्टानं हेदेखील स्पष्ट केलंय की दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके वाजवण्यावर बंदी नाही. यामुळे, फटाक्यांच्या कारणामुळे प्रदूषणावर किती फरक पडतो, याचं आकलन होण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हा निर्णय सुनावलाय. 

या निर्णयावर लेखक चेतन भगत यानं मात्र टीका केलीय. त्यानं या निर्णयाचा विरोध केलाय. इतकंच नाही तर फटाक्यांची तुलना त्यानं नाताळातील ख्रिसमस ट्री आणि बकरी ईदच्या दिवशी होणाऱ्या बकऱ्यांच्या हत्येशी करत, या गोष्टींवरही बंदी घालण्यात यावी, असं म्हटलंय.