Video: गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांचे मोदींनी पाय धुतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये जाऊन गंगापूजन केलं.  

Updated: Feb 24, 2019, 07:17 PM IST
Video: गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांचे मोदींनी पाय धुतले title=

प्रयागराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराजमध्ये जाऊन गंगापूजन केलं.  कुंभमेळ्याचं औचित्य साधून त्यांनी यावेळी गंगा नदीत स्नानही केलं. गंगा स्नानंतर मोदींनी तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांचे पायही धुतले. सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्यानंतर मोदींनी त्यांना शाल देऊन सन्मानितही केलं. प्रयागराजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्नानही केलं. याआधी मोदींनी कुंभ मेळ्यात जाऊन मंत्र म्हणून पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा आरतीही केली. यानंतर मोदींनी तिकडे उपस्थित असलेल्यांना प्रसादाचं वाटप केलं. लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयागराजमध्ये कुंभ स्नान केलं. एवढच नाही तर योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळाची बैठकही प्रयागराजमध्ये घेण्यात आली होती. योगींच्या अनेक मंत्र्यांनीही कुंभमध्ये स्नान केलं.