गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर

Updated: Feb 24, 2019, 04:55 PM IST
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर title=

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयातील डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले भाजपाचे वरिष्ठ नेते मनोहर पर्रिकर सध्या डोना पौला येथील त्यांच्या निवासस्थानी राहत आहेत. ६३ वर्षीय पर्रिकर यांना शनिवारी रात्री उशिरा गोवा मेडिकल कॉलेज आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी पर्रिकर यांनी शहर आणि ग्रामीण योजना मंत्री विजय सरदेसाई यांची भेट घेत राजकीय आणि प्रशासकीय गोष्टींवर चर्चा केली. रात्री रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

२०१८ मधील फेब्रुवारी महिन्यापासून त्यांच्यावर पेनक्रेटीक कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. या आजारावर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील लीलावती रुग्णालयात आणि त्यानंतर दोन वेळा परदेशात जाऊन उपचार घेतले होते.