या सणाला 'TRADITIONAL' लुक करणार आहात ..मग 'या' इअर रिंग्स शिवाय लुक पूर्ण होणारच नाही

हे इअर रिंग्स नक्की ट्राय करा हे इअर रिंग्स तुम्हाला खूप वेगळा लुक नक्की देतील

Updated: Aug 1, 2022, 06:22 PM IST
या सणाला 'TRADITIONAL' लुक करणार आहात ..मग 'या' इअर रिंग्स शिवाय लुक पूर्ण होणारच नाही  title=

TRADITIONAL LOOK EARRINGS:    सणासुदीचे दिवस जवळ येऊ लागलेत अशावेळी खासकरून महिला वर्गाची लगबग सुरु असते कोणता ड्रेस घालावा इथपासून ते अगदी कोणत्या ड्रेसवर कोणते कानातले छान दिसतील असा सगळंच गोंधळ होऊन जातो सणासुदीच्या काळात आपण अनारकली ड्रेस ला जास्त प्राधान्य देतो कारण हा ड्रेस लुकसोबत कम्फर्ट सुद्धा देतो .मात्र अनारकलीवर जर तुम्ही सूट होतील असे कानातले घातलेत तर मात्र तुम्ही तुमचा लुक आणखी छान बनवू शकता. 
चला तर जाणून घेऊया तुमच्या अनारकलीवर मॅच होणारे परफेक्ट इअर रिंग्स 

झुमका 

अनारकली ड्रेससोबत झुमके खूप छान दिसतात जर झुमके घालणं आवडत असतील तर सिल्व्हर झुमके निवडा ते तुम्हाला बेस्ट लुक देतील,पांढऱ्या रंगाच्या अनारकली ड्रेसवर असो किंवा लाल रंगाचा ड्रेस असो सिल्व्हर इअर रिंग्स नेहमी उत्तम लुक देतील.जर तुम्ही हेव्ही वर्क असणारा अनारकली ड्रेस घातला असेल तर त्यावर क्लीन सिल्वर किंवा गोल्डन झुमका ट्राय  करू शकता आणि जर तुम्ही सिंपल अनारकली घातला असेल तर स्टोन असणारे किंवा हेवी झुमका घालू शकता 

टीअरड्रॉप इअर रिंग्स 

जर तुम्ही अनारकली ड्रेस घातला आहे तर तुम्ही त्यावर हे इअर रिंग्स नक्की ट्राय करा हे इअर रिंग्स तुम्हाला खूप वेगळा लुक नक्की देतील या इअर रिंग्सची  एक खासियत आहे  ती म्हणजे अनारकली असो व कोणताही कॅज्युअल लूक तुम्ही ते सहज कॅरी करू शकता 

चांदबाली

चांदबाली अनारकली सूट वर खूप शोभून दिसतात .कोणत्या पार्टीसाठी तुम्हाला जर हेवी लुक करायचा असेल किंवा रॉयल लुक करायचा असेल तर उत्तम चांदबाली पर्याय आहे.

जडाऊ इअररिंग्स 

जर तुम्ही अनारकली सूटवर फक्त इअररिंग्स घालणार असाल तर हा पर्याय निवडू शकता यामुळे स्टेटमेंट लुक क्रियेट करू शकता हे वजनाने थोडे हेवी असतात आणि यामुळे खूप रॉयल लुक तुम्हाला मिळतो