Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात

Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

नेहा चौधरी | Updated: Nov 21, 2023, 07:31 PM IST
Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात title=
Wedding man wear 20 lakh rupees note necklace or garland made of 500 rupees note instagram video viral on Internet

Wedding Viral Video :  तुळशी विवाहनंतर लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर लग्नाचे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. नवरदेव, नवरीचे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या नवरदेवाची अस्वस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. भारत हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे राहतात. त्यामुळे लग्नाच्या परंपरा आणि प्रथाही वेगवेगळ्या असतात. (Wedding man wear 20 lakh rupees note necklace or garland made of 500 rupees note instagram video viral on Internet)

अबब! हा हार आहे की...!

काही ठिकाणी नवरदेवाच्या गळ्यात पैशांचा हार घातला जातो. हा हार खऱ्या किंवा खोट्या पैशांचा असतो. पण व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला आहे. या हाऱ्यासाठी 500 रुपयांच्या नोटांचा वापर केला गेला आहे. या हाराची लांबी एवढी होती की नवरदेवाला घराच्या छतावर चढण्याची वेळ आली होती. 500 रुपयांच्या नोटांचा वापर करुन फुलांसारखा हा हार तयार करण्यात आला होता. 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर @dilshadkhan_kureshipur ने  शेअर केला आहे. हा व्हिडीओ हरियाणातील एका गावातील असल्याचं बोलं जातं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. एका यूजरने म्हटलं आहे की, या नवरदेवाने ड्रीम 11 जिंकलं आहे वाटतं. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. या हारची लांबी एवढी आहे की तो नवरदेव घराच्या गच्चीवर उभा राहिला तरी त्या हार अंगणात लांब पर्यंत पसरला आहे. 

हा व्हिडीओ पाहून एक यूजर्स म्हणतो की, आता हा कर्ज कसं फेडणार? तर दुसरा म्हणतो हा व्हिडीओ पाहून त्याच्या घरावर आयकर विभाग नक्कीच पोहोचतील.