close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजगरासोबत सेल्फी काढायला गेला आणि...

नसती उठाठेव कशाला?

Updated: Jun 18, 2018, 09:54 PM IST

जलपैगुडी : पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी इथल्या वैकुंठपूर जंगलात विचित्र अपघात होता होता राहिला. एका अजस्त्र अजगरासोबत सेल्फी काढणं वन विभागाच्या रेंज ऑफीसरला महागात पडलं. संजय दत्ता नावाच्या रेंज ऑफीसरने एक अजगर पकडला. त्या अजगराला गळ्यात अडकवून त्याच्या सोबत सेल्फी घेत असताना त्या अजगराने दत्ता यांच्या गळ्याभोवती वेटोळं घेत थेट गळा आवळला. मात्र सहकाऱ्यांनी तातडीने अजगराच्या तावडीतून दत्ता यांची सुटका केल्याने त्यांचा प्राण थोडक्यात वाचला.