What is SmilePay: एखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता. पण तुमच्या एका स्माईलने पेमेंट होत असेल असं कोणी सांगितलं तर? विश्वास बसत नाहीय ना. पण हे खरं आहे. आपली स्माईल किती मौल्यवान आहे, हे तुमच्या आता लक्षात येणार आहे. कशी असेल ही यंत्रणा? कोणाला घेता येणार याचा लाभ जाणून घेऊया. तुमचं अकाऊंट फेडरल बॅंकेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. खासगी क्षेत्रातील फेडरल बॅंकेने स्माइल पे नावाचे फेशियल पेमेंट सिस्टिम सुरु केले आहे. यामध्ये कस्टमर कॅमेरावर स्माइल करुन पेशांचे व्यवहार करु शकणार आहेत. ही सेवा सुरु झाल्यावर तुम्हाला पैशांचा व्यवहार करण्यासाठी कॅश, कार्ड किंवा मोबाईलची गरज लागणार नाही. रिलायन्स रिटेल आणि अनन्या बिर्लाच्या स्वतंत्र मायक्को फायनान्सच्या माध्यमातून तुम्ही काही निवडक ब्रांचवर याचा वापर करु शकता.
आता या सुविधेचा पायलट प्रोजेक्ट सुरु आहे. 'भीम आधार पे' वर आधारित या सिस्टिमवर आधार नंबरशी लिंक करुन पैसे काढण्यासाठी बायोमॅट्रीक डेटाचा वापर करु शकता. या सिस्टिमविषयी महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्हाला यूआयडीएआयकडून पूर्णपणे सुरक्षित फेशियल रिकग्निशन सिस्टम वापरता येणार आहे. स्माइल फेसबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
स्माइल पे संदर्भात फेडरल बॅंकेने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. ही देशातील विशेष पद्धतीची पेमेंट सिस्टिम आहे. यात यूआयडीएआयच्या भीम आधाप पे वर बनलेली अपग्रेड फेस रिकग्नेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. स्माइल पे यूजर्स आपला चेहरा स्कॅन करुन पेमेंट करु शकणार आहेत. ही सुविधा सुरु झाल्यानंतर ग्राहक कार्ड किंवा मोबाईलशिवायही पेमेंट करु शकणार आहेत. हा पूर्ण व्यवहार 2 स्टेप्समध्ये पूर्ण होईल. फेडरल बॅंकच्या सीडीए इंद्रनील पंडित यांनी यासंदर्भात माहिती दिली. कॅशमधून कार्ड, क्यूआर कोडमधून पेमेटनंतर आता तुमच्या एका स्माइलने पेमेंट होणं खूप रोमांचक असेल. तुम्हाला ही सुविधा खूप आवडेल अशी आशा इंद्रनील यांनी व्यक्त केली आहे.
स्माइल पेच्या माध्यमातून तुम्ही कॅश, कार्ड किंवा मोबाईल डिवाइस नसतानाही पैशांचा व्यवहार पूर्ण करु शकता. यासोबतच ही सुविधा सुरु झाल्यानंतर कॅश काऊंटवर लागणाऱ्या रांगेपासून तुम्हाला दिलासा मिळेल. सेफ यूआयडीएआय फेस रिकग्नेशन सर्व्हिस आधारे तुम्ही सुरक्षिक आणि विश्वसनीय व्यवहार करु शकता. स्माइल पे फिचरचा वापर फेडरल बॅंकेच्या कस्टमर्सना करता येणार आहे. यामुळे व्यापारी आणि ग्राहक अशा दोघांचेही खाते असणे आवश्यक आहे. फेडरल बॅंक येणाऱ्या काळात या योजनेचा विस्तार करण्याच्या विचारात आहे.
फेडरल बॅंकशी संबंधित दुकानदारांकडे जाणाऱ्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये फेड मर्चंट अॅप असणं आवश्यक आहे. तुम्हाला बिलिंग करायचे असेल तर चेकआऊट करताना स्माइल पेचा पर्याय निवडा. दुकानदार ग्राहकाचा आधार नंबर टाकून फेड मर्चंट अॅवर पेमेंट करु शकेल. दुकानदाराच्या मोबाईलचा कॅमरा ग्राहकाचा चेहरा स्कॅन करेल आणि यूआयडीएआय सिस्टिमच्या आधारे रिकग्नेशन डेटाशी जोडेल. योग्य पडताळणी झाल्यास तात्काळ पेमेंट होईल आणि ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट होतील. हे पैसे दुकानदाराच्या फेडर बॅंक अकाऊंटमध्ये जाकील. पेमेंट प्रोसेस झालाच्या मेसेज फेड मर्चंट अॅंवर येईल.