मुंबई : सरकारने आपल्या निवृत्तीसाठी तयार केलेले विशेष फंड म्हणजेच EPF, GPF, PPF होय. खासगी, सरकारी आणि असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हे फंड असतात..
प्रोव्हिडंट फंड ही रिटायरमेंटची प्लॅनिंग
सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते प्रायव्हेट कर्मचाऱ्यांपर्यंत वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे प्रोव्हिडंट फंड आहेत. दीर्घ गुंतवणूकीसाठी सर्वांत उत्तम पर्याय आहे. प्रोव्हिडंट फंड 3 प्रकारचे असतात.
1 कर्मचारी भविष्य निधी
2 सार्वजनिक भविष्य निधी
3 जनरल प्रोव्हिडंट फंड
या खात्यांमध्ये दरमहिना ठरलेली रक्कम जमा केली जाते. तिन्ही फंडच्या व्याजात काय अंतर असते पाहू या
Employees Provident Fund (EPF)
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी EPF असते. यात प्रत्येक कर्माचाऱ्यांचे आपले प्रोव्हिडंट फंडचे खाते असते. यामध्ये पगाराच्या 12 टक्के भाग जमा होत असतो. कंपनीच्यातर्फे देखील 12 टक्के भाग जमा होत असतो. EPF वर 8.50 टक्के व्याज मिळते.
Public Provident Fund (PPF)
ही सरकारची स्मॉल सेविंग स्कीम आहे. ही योजना इतर लोकांसाठी आहे यामध्ये खाते उघडून पैसे जमा करता येतील. हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा इतर बँकांमध्ये उघडू शकता. या योजनेत पैसे गुंतवल्याने आयकरातील टॅक्स कपातीत सवलत मिळते. या योजनेवर 7.1 टक्के व्याज मिळते.
General Provident Fund (GPF)
जनरल प्रोव्हिडंट फंडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असते. हे एकप्रकारे निवृत्ती फंड असते. त्यांची पूर्ण रक्कम निवृत्ती नंतर मिळते. सरकारी कर्मचारी आपल्या पगाराच्या 15 टक्के GPF खात्यात जमा करू शकता. या खात्यावर 7.1 टक्के व्याज दिला जातो.