Corona : मुलांसाठी कधीपर्यंत येणार वॅक्सीन? आदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य

Omicron प्रकाराने चिंता वाढवल्या असताना आता लहान मुलांना कोरोनावरील लस कधी मिळणार याबाबत सगळेच वाट पाहत आहेत.

Updated: Dec 14, 2021, 08:01 PM IST
Corona : मुलांसाठी कधीपर्यंत येणार वॅक्सीन? आदर पुनावाला यांचं मोठं वक्तव्य title=

मुंबई : ओमायक्रॉनचा (Omicron) वाढता प्रकोप पाहता देशात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचे तसेच प्रौढांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र आता लहान मुलांच्या लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढील सहा महिन्यांत मुलांसाठी कोविड-19 लस आणण्याची योजना आखली आहे. 

कंपनीचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पूनावाला म्हणाले की ही लस प्रभावी ठरेल.

आदर पूनावाला यांचे मोठे वक्तव्य

एका औद्योगिक परिषदेत भाग घेताना, पूनावाला म्हणाले की 'कोवोवॅक्स' लस चाचणीत आहे आणि ती तीन वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना सर्व प्रकारचे संरक्षण प्रदान करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध होऊ शकते. त्यांनी पुढे सांगितले की चाचणीचे उत्कृष्ट आकडे पाहिले गेले आहेत.

आकडे काय सांगतात
पूनावाला म्हणतात की, लस मुलांना संसर्गजन्य रोगापासून वाचवेल हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा डेटा आहे. कोविडशिल्ड आणि इतर कोविड लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मंजूर आहेत. जर सर्व काही पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार झाले तर लवकरच मुले देखील या संसर्गापासून बचाव करू शकतील.

लहान मुलांसाठी दिलासादायक बातमी

पूनावाला म्हणाले, 'आम्ही लहान मुलांमध्ये जास्त गंभीर आजार पाहिलेले नाहीत. सुदैवाने मुले घाबरत नाहीत. आम्ही सहा महिन्यांत मुलांसाठी लस आणू, आशा आहे की ती तीन वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी असेल.

omicron वर काय म्हणाले

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ म्हणाले की, जर लोकांना वाटत असेल की आपल्या मुलाचे लसीकरण केले पाहिजे, तर त्यासाठी सरकारच्या घोषणेची वाट पहा. कोविडच्या ओमिक्रॉन प्रकारावर पूनावाला यांनी अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही, त्याचा मुलांवर कसा परिणाम होईल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x