जेष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना आज कुठल्याच ओळखीची गरज नाहीये. लहान मुले असोत की तरुण, प्रत्येकजण त्यांना ओळखतो आणि त्यांच्या साधेपणाला सलाम करतो. व्यावसायिक जगतात इतकं मोठे नाव असूनही त्यांना कधीतरी अपमानाला (insult) सामोरे जावे लागले होते. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या अपमानाचा बदला घेतला ते अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. ज्येष्ठ भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका (harsh goenka) यांनी ट्विटरवर (twitter) त्यांचा एक प्रेरणादायी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होत आहे.
सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका (harsh goenka) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीकडून (Ratan Tata Vs Ford) घेतलेल्या सूडाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. नव्वदच्या दशकात, टाटा मोटर्सने फोर्डशी आपला कार विभाग विकण्यासाठी कशा पद्धतीने भाष्य केले आणि आणि लक्झरी कार निर्मात्याच्या मालकाने त्यांना कसे अपमानित केले ते सांगितले आहे. त्यानंतर रतन टाटा (Ratan Tata) यांनी कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय पुढे ढकलला आणि फोर्डला (Ford) असा धडा शिकवला ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
हा व्हिडिओ शेअर करत हर्ष गोयंका यांनी त्याच्या कॅप्शनमध्ये, 'फोर्डकडून अपमानित झाल्यावर रतन टाटा यांची प्रतिक्रिया,' असे लिहिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यास नव्वदच्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या माध्यमातून टाटा इंडिका (tata indica) लॉन्च केली होती. पण त्याचे लाँच फ्लॉप ठरले आणि परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना आपली कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी रतन टाटा यांनी 1999 मध्ये फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड (bill ford) यांच्याशी झालेल्या कराराबद्दल सांगितले.
तिथूनच सूडाची कहाणी सुरू झाली, जे आजही प्रेरणादायी उदाहरण आहे. अमेरिकेत बिल फोर्डने या कराराबद्दल रतन टाटांची खिल्ली उडवली आणि अपमान करत, 'तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही प्रवासी कारचा विभाग का सुरू केला? जर मी हा करार केला तर ते खूप मोठे उपकार असेल,' असे म्हटले.
टाटा मोटर्सने 9 वर्षांत उंची गाठली
अमेरिकेत या अपमानानंतरही रतन टाटा शांत राहिले आणि त्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी त्याच रात्री ठरवले की ते टाटा मोटर्सचा कार विभाग विकणार नाहीत. त्याच रात्री रतन टाटा रात्री मुंबईला परतले. त्यांनी या अपमानाचा कोणताही उल्लेख केला नाही, पण कंपनीच्या कार विभागाला उंचीवर नेण्यासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली. रतन टाटा यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि जवळपास नऊ वर्षांनंतर, म्हणजे 2008 मध्ये टाटा मोटर्सने जगभरातील बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आणि कंपनीच्या गाड्या बेस्ट सेलिंग श्रेणीमध्ये अव्वल स्थानावर आल्या.
Ratan Tata’s response when he was humiliated by Ford pic.twitter.com/y51ywPlnfW
— Harsh Goenka (@hvgoenka) October 31, 2022
बिल फोर्ड यांना गाठावी लागली मुंबई
रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने उंची गाठली असतानाच दुसरीकडे बिल फोर्डच्या नेतृत्वाखालील फोर्ड मोटर्सची अवस्था दयनीय झाली होती. बुडणाऱ्या फोर्ड कंपनीला वाचवण्यासाठी रतन टाटा पुढे आले, पण हा केवळ त्यांच्या अपमानाचा बदला घेण्याचा मार्ग होता. फोर्ड जेव्हा प्रचंड तोट्यात होते, तेव्हा 2008 मध्ये टाटाचे चेअरमन रतन टाटा यांनी बिल फोर्ड यांना त्यांच्या कंपनीचे सर्वात लोकप्रिय जॅग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड्स खरेदी करण्याची ऑफर दिली. या करारासाठी रतन टाटा यांना अमेरिकेला जावे लागले नाही, तर त्यांचाच अपमान करणाऱ्या बिल फोर्ड यांना त्यांच्या संपूर्ण टीमसह मुंबईत यावे लागले.
तुम्ही आमच्यावर उपकार करत आहात - बिल फोर्ड
मुंबईत रतन टाटांची ऑफर स्वीकारताना बिल फोर्ड यांचा सूर बदलला. टाटा मोटर्सच्या कार डिव्हिजनसाठी डील करताना रतन टाटा यांच्याकडे नेमके काय मागितले होते, याची पुनरावृत्ती त्यांनी केली. भेटीदरम्यान, फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले आणि "तुम्ही जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करून आमच्यावर मोठे उपकार करत आहात," असे म्हटले.
दरम्यान, जॅग्वार आणि लँड रोव्हर कार टाटा मोटर्सच्या सर्वात यशस्वी विकल्या जाणार्या मॉडेल्सपैकी एक आहेत. हर्ष गोयनकांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि ट्विअर यूजर्स त्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.