Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे

Government Schemes : देशातील प्रत्येक नागरिकाला सरकारी कामांसाठी जी काही कागदपत्र हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळणार आहेत. तशी व्यवस्था सरकारने केली आहे. ही कागदपत्रे संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहेत.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 29, 2023, 02:17 PM IST
Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर या संकेतस्थळावर होतील सगळी कामे  title=

Government Schemes : आधार, पॅन नंबर प्रत्येक कामासाठी गरजेचा झाला आहे. सरकारी योजना असो किंवा बँकेचे काम असो. या सगळ्या कामांसाठी याची निकड भासते. आता सरकारने एकाच ठिकाणी हे सगळं कसं मिळेल, याची व्यवस्था केली आहे. Aadhaar-Pan लिंक करण्यासह Birth Certificate हवे असेल तर ते एकाच ठिकाणी मिळणार आहे.

 सरकार देशातील नागरिकांसाठी एकापेक्षा जास्त योजना आणत आहे. तसेच सरकारी काम कसे अधिक सोपे होईल, याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन सर्व कामे कमी वेळेत करता येतील आणि तुमचा अधिकचा वेळ वाचू शकणार आहे. लांबून येणाऱ्या लोकांना सातत्याने सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे त्यांचा त्रास वाचणार आहे. सरकारी योजनांसाठी जी काही आवश्यक कागदपत्रं हवी असतील ती एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. 

या कागदपत्रांमुळे सरकारी योजनांचा लाभ मिळतो, किंवा त्याशिवाय सरकारी कामे करता येत नाहीत. अशा परिस्थितीत योजनांचा आणि सरकारी कामांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने ऑनलाइन पद्धतही तयार केली आहे. ज्याद्वारे सरकारी कामे घरबसल्या करता येतील आणि त्यासाठी कोणालाही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुम्हालाही कोणतेही सरकारी काम करायचे असेल किंवा सरकारच्या आकर्षक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत जी खूप सोपी आहे.  त्यामुळे ही कागदपत्रे मिळविण्यासाठी तुमची ओढाताण होणार नाही.

 सरकारी योजनांचा लाभ 

आज आम्ही तुम्हाला ज्या पोर्टलबद्दल सांगत आहोत त्याचे नाव service.india.gov.in आहे.  या पोर्टलवर कोणताही नागरिक अत्यावश्यक सेवांचा लाभ घेऊ शकतो. तुम्हाला आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक कराचे असेल किंवा सरकारी लिलावात सहभागी व्हावे व्हायचे असेल, तुमचा कर जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जन्म प्रमाणपत्र बनवायचे असेल तर या वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमची सर्व कामे लवकर होतील. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाइटवर जाण्याची गरज नाही. सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. 

या सरकारी पोर्टलवर अर्थ मंत्रालयाच्या 121 सेवा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या 100 सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 72 सेवा, वैयक्तिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या 60 सेवा आहेत. शिक्षण 46 सेवा, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या 39 सेवा, परराष्ट्र मंत्रालयाच्या 38 सेवा अशा विविध सेवा उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही तुमची आवडती सेवा निवडू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता.