Haryana Jalebi Baba : जलेबी बाई नंतर आता एक जलेबी बाबा चर्चेत आला आहे. जलेबी बाईने नागरिकांचे मनोरंजन केले. मात्र, या जलेबीबाने शेकडो महिलांचे आयुष्य बर्बाद केले आहे. जलेबी बाबा अमरपुरी(jalebi baba amarpuri) असं या बाबचे नाव आहे. हरियाणाच्या(Haryana) या जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले. महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हरियाणातील फतेहाबादमध्ये आपल्या भोंदुगीरीने महिलांना गंडवणाऱ्या हा जलेबी बाबा 63 वर्षांच आहे. या जलेबी बाबा अमरवीरला 100 हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. जलेबी बाबा अमरपुरी हा 'बिल्लू' नावाने देखील प्रसिद्ध आहे. विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाने या जलेबी बाबाला दोषी ठरवले आहे. जलेबी बाबावर फक्त बलात्काराचाच आरोप नाही, तर त्याच्यावर फसवणुकीचा देखील आरोप झाला आहे. महिलांवर बलात्कार रुन तो त्याच्या व्हिडिओ क्लिप बनवून पीडित महिलांना ब्लॅकमेल करत होता.
फतेहाबादच्या टोहाना शहर पोलिसांनी 2018 मध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या पीडितांचे असे सुमारे 120 व्हिडिओ तपासादरम्यान समोर आले. जलेबी बाबाच्या मोबाईलवरून त्याने महिलांवर बलात्कार करतानाचे व्हिडिओ शूट केले होते.
जलेबी बाबा हा 23 वर्षांपूर्वी पंजाबच्या मानसा शहरातून तोहानाला आला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. चार मुली आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सुरुवातीला तो 13 वर्षे त्यांनी जिलेबीचा स्टॉल चालवला. यादरम्यान त्यांची भेट एका तांत्रिकाशी झाली ज्याने त्यांना तांत्रिक साधनेची सुरुवात केली. यानंतर तो टोहना येथून काही वर्षे गायब झाला. यानंतर तो परत गावात आला आणि मंदिराशेजारी घर बांधले.
हळू हळू त्याने भोंदुगिरीचा धंदा थाटला आणि बघता बघता तो जलेबी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या अनुयायांची संख्या वाढू लागली. या महिलांची संख्या जास्त होती. 2018 मध्ये त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्यावर मंदिरात बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला. मात्र, पोलिसांनी तपास सुरु ठेवला यावेळी. यानंतर जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याच्यार केल्याच्या व्हिडिओ क्लीप पोलिसांच्या हाती लागल्या. या सर्व व्हिडिओ क्लीप पोलिसांनी सायबर सेल मार्फत तपासल्या असून यात महिलांवर अत्याचार करणारा व्यक्ती हा जलेबी बाबाच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.