Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत

PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

सौरभ तळेकर | Updated: Feb 14, 2024, 08:48 AM IST
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत title=
PINEWS Survey

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तयारी आता सुरू झालीये. भाजप, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार कामाला सुरूवात केली आहे. सार्वत्रिक निवडणूक 2024 एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात संपेल, अशी शक्यता आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जातीये. अशातच आता भाजप तिसऱ्यांदा सत्तेत बसून देशाच्या राजकारणात इतिहास रचणार का? की काँग्रेस डामेजब्रेक म्हणून समोर येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी 22 जानेवारी रोजी अयोध्येतून PINEWZ लाँच केले होते. लोकसभा निवडणुकीच्या या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी तुम्हाला झी न्यूजचे हे हायपर लोकल ॲप PINEWZ डाउनलोड करावे लागेल. तुम्ही Google Play Store वरून PINEWZ ॲप डाउनलोड करू शकता. PINEWZ हे हायपर लोकल ॲप आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किंवा दुसऱ्या शब्दांत रस्त्यावरून येणाऱ्या बातम्यांबाबतही जागरूक राहू शकता. यासाठी तुम्हाला APP मध्ये तुमचे लोकेशन चालू करावे लागेल किंवा पिन कोड टाकावा लागेल. हे देखील एक प्रकारचे ‘नागरिक पत्रकार’ व्यासपीठ आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या गावाच्या आणि शहराच्या बातम्याही जगासमोर मांडू शकता.