नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्वाची माहिती दिली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा आकडा कळण्यासाठी कोरोना लक्षण नसलेल्यांची देखील चाचणी केली जावी असे डब्ल्यूएचओने म्हटलंय.
ज्यांना कोरोनाची लक्षण फार कमी आहेत किंवा नाहीयत अशांती देखील चाचणी करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना लक्षण नाहीत त्यांनी चाचणी करण्याची गरज नसल्याचे अमेरिकन आरोग्य यंत्रणेतर्फे सांगण्यात येत होते. पण आता आरोग्य यंत्रणेने आपल्या नितीमध्ये बदल केलाय.
कोरोना संक्रमित व्यक्तीच्या १.८ मीटर इतक्या संपर्कात १५ मिनिटाहून अधिक वेळ असाल तर त्याची चाचणी व्हायला हवी असे अमरेकिन आरोग्य यंत्रणेने म्हटले होते. पण नव्या निर्देशांनुसार जर तुम्ही संपर्कात आला नसाल तर चाचणी करण्याची गरज नसल्याचे देखील सागंण्यात आले होते.
लोक आता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत नाहीत. संशोधनाला संधी म्हणून पाहीले पाहीजे. त्यामुळे संक्रमित असलेल्यांना वेगळे ठेवता येऊ शकेल. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितलंय.
लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत हा चिंतेचा विषय असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटलंय. मास्क घातल्यानंतरही एक मीटर अंतर राखणं गरजेचं असल्याचं देखील सांगण्यात आलंय.
देशात अनेक सक्तीचे नियम लागू केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचं चित्र समोर आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी १ सप्टेंबरपासून देशात अनलॉक ४ सुरू होणार आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं, मास्क वापरणे इत्यादी नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे.
भारतात गेल्या २४ तासांमध्ये देशात ७७ हजार २६६ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३३ लाख ८७ हजार ५०१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६१ हजार ५२९ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू असून २५ लाख ८३ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.