नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशाचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शिमल्यात सुरु झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीआधी प्रेमकुमार धुमल यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आमदारांच्या बैठकीसाठी दिल्लीहून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि नरेंद्र सिंह तोमर शिमल्यात पोहोचले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावावर एकमत व्हावं यासाठी या दोन्ही नेत्यांची संघाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच ही घोषणाबाजी करण्यात आली.
हिमाचलमध्ये संपूर्ण बहुमत मिळालं असलं, तरी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आलेले प्रेमकुमार धुमल मात्र पराभूत झालेत. त्यामुळे आता धुमल यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकलं गेलंय. पण धुमल यांनाच मुख्यमंत्री करावं असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी केलीय.
Supporters raise slogans in support of Prem Kumar Dhumal outside venue of Core Committee meeting in Shimla; BJP observers Nirmala Sitharaman and Narendra Singh Tomar also present in the meet #HimachalPradesh pic.twitter.com/o3ZqRm6Hwl
— ANI (@ANI) December 22, 2017
तर तिकडे पाच वेळा निवडणूक जिंकलेले भाजप आमदार जयराम ठाकूर यांच्या नावासाठीही जोरदार लॉबिंग सुरू आहे. अशा परिस्थीत संघाच्या नेत्याशी बैठक सुरू असतानाच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.