JEE, UPSC, GATE Exam : दरवर्षी लाखो उमेदवार IIT-JEE, UPSC आणि GATE परीक्षा देतात. राष्ट्रीय स्तरावर या परीक्षा आयोजित केल्या जातात. ऑनलाइन एज्युकेशन सर्च प्लॅटफॉर्म असलेल्या इरुडेराच्या (Erudera) अहवालानुसार या परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुलांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. या परीक्षेतील प्रश्न पाहून डोकं गरगरतं. या परीक्षांच्या मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न देखील अत्यंत कन्फ्यूज करणारे असतात.
IIT-JEE ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. तर, IIT-JEE ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा आणि गेट या परीक्षाांना देखील जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये तिसरे आणि आठवे स्थान देण्यात आले आहे.
IIT-JEE प्रवेश परीक्षा दरवर्षी IIT मध्ये केवळ 11,000 जागांसाठी घेतली जाते. दुसरीकडे, संघ लोकसेवा आयोगाकडून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर UPSC नागरी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेचे तीन टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी कठोर तयारी आवश्यक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात.
IIT, IISc आणि NIT मध्ये पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी GATE परीक्षा घेतली जाते. दरवर्षी सुमारे 6-7 लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. त्यापैकी फक्त 15 ट्कके विद्यार्थींच आवश्यक 25 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवतात.
IIT-JEE (संयुक्त प्रवेश परीक्षा) ही राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आहे. आयआयटी आणि भारतातील इतर उच्च स्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. या प्रवेश परीक्षेत बारावी विज्ञान आणि मॅथेमॅटिक विषय घेतलेले विद्यार्थी भाग घेतात. या प्रवेश परीक्षेत, प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातील, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. जेईई मेन परीक्षेतील यशस्वी उमेदवार जेईई अॅडव्हान्स लेव्हलसाठी पात्र ठरतात. अहवालानुसार, जेईई परीक्षा चीनच्या गाओकाओ परीक्षेनंतर दुसऱ्या क्रमांकाची कठिण परीत्रा आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) भारत सरकारमध्ये IAS भरतीसाठी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा (CSE) घेतली जाते. UPSC CSE परीक्षा देखील जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. प्राथमिक परीक्षेतील यशस्वी उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाते.
ही परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांपैकी फक्त 5 टक्के उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. तर, मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांची संख्या 0.4 टक्के इतकी आहे. UPSC परीक्षेची तुलना कॅलिफोर्निया बार परीक्षेशी केली जाते. कॅलिफोर्निया बार परीक्षा यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. ही परीक्षा दोन दिवसांत होते आणि तिच्या अनेक फेऱ्या असतात.
ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग अर्थात GATE ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. दरवर्षी सुमारे 8 लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. यापैकी फक्त 16-18% उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतात आणि 25 पेक्षा जास्त गुण मिळवतात. GATE ची तुलना युनायटेड स्टेट्सच्या GRE या परीक्षेसह केली जाते. जी जगातील पाचवी सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.