पत्नीनेच दिली पतीचं गुप्तांग कापण्याची सुपारी आणि मग...

...

Updated: Jun 18, 2018, 01:42 PM IST
पत्नीनेच दिली पतीचं गुप्तांग कापण्याची सुपारी आणि मग...
Representative Image

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. इतकेच नाही तर या महिलेने आपल्या पतीचा गुप्तांग (प्रायव्हेट पार्ट) कापून त्याची हत्या करण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

आरोग्य विभागात उपसंचालक असलेल्या डॉ. शफात उल्लाह खान यांची हत्या करण्यात आली आहे. डॉ. शफात यांच्या हत्येची त्यांचीच पत्नी आयशा खान हिने सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. 

जबलपूरचे पोलीस अधिक्षक शशिकांत शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शफात उल्लाह खान यांच्या हत्येचा कट त्यांच्याच पत्नीने रचला होता. दोघांनी १९९१ मध्ये प्रेम विवाह केला होता. मात्र, शफात उल्लाह खान याच्या अनैतिक संबंधांमुळे दोघांमध्ये वाद होत असत.

दोघांमध्ये होणाऱ्या वादाला कंटाळून आयशाने गुजरातमध्ये राहणारी भाची नंदिनी विश्वकर्मा उर्फ जन्नत हिला सुपारी दिली. त्यानंतर नंदिनीने आपला पती पवन सोबत चर्चा करुन हत्येचा कट रचला. मग, पवनने आपल्या दोन मित्रांना सोबत घेत डॉ. शफात यांची हत्या केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या केल्यावर तुम्हाला पाच लाख रुपये आणि एक फ्लॅट देण्याचं आश्वासन आयशाने नंदिनी आणि पवन यांना दिलं होतं. तर, पवनच्या दोन मित्रांना दहा हजार रुपये दिले होते आणि काम झाल्यावर ५०-५० हजार रुपये देण्याचं ठरलं होतं. 

या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाच जणांपैकी तिघांना (आयशा, नंदिनी, राजेंद्र) पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.