व्हॉट्सअॅप चॅट चेक केले म्हणून पत्नीने केला पतीवर हल्ला

नवऱ्याने व्हॉट्सअॅप चॅट चेक करण्यासाठी फोन घेतला म्हणून पत्नीने त्याच्यावर हल्ला केल्याची घटना आग्र्यात घडलीये. घटनेनंतर महिलेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिला पकडले. 

Updated: Jun 12, 2017, 01:05 PM IST
व्हॉट्सअॅप चॅट चेक केले म्हणून पत्नीने केला पतीवर हल्ला title=

आग्रा : नवऱ्याने व्हॉट्सअॅप चॅट चेक करण्यासाठी फोन घेतला म्हणून पत्नीने त्याच्यावर हल्ला केल्याची घटना आग्र्यात घडलीये. घटनेनंतर महिलेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिला पकडले. 

शनिवारी रात्री खेरागडच्या भिलवली गावात ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या नेत्रपालला एसएन मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलंय. त्याच्या डोक्याला टाके पडलेत. 

नेत्रपाल आणि नीतू सिंह यांचे २०१४मध्ये लग्न झाले होते. मात्र दोघे वेगवेगळे राहत होते. 

नेत्रपालने दिलेल्या जबाबानुसार, शनिवारी रात्री मी माझ्या बायकोला चॅट करताना पाहिले. जेव्हा मी तिच्याकडे फोन मागितला तेव्हा तिने नकार दिला. मात्र त्यानंतर मी तिच्याकडून जबरदस्तीने चॅट डिटेल पाहण्यासाठी फोन हिसकावून घेतला मात्र त्याचवेळी तिने माझ्यावर हल्ला केला आणि मी बेशुद्ध झालो. 

दरम्यान, नेत्रपालने केलेले आरोप नीतूने फेटाळून लावलेत. तिला फसवण्यासाठी नेत्रपालने स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतल्याचे नीतूने म्हटलेय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.