लखनऊ : Uttar Pradesh Election : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. आमचे सरकार आल्यास आम्ही जुनी पेन्शन व्यवस्था सुरु करु, असे जाहीर केले. आता उत्तर प्रदेश ( UTTAR PRADESH) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा पाऊस पडत आहे.
अखिलेश यादव यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात आल्यास कर्मचाऱ्यांसाठी 2005 पूर्वीची जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केली जाईल. त्यासाठी आवश्यक निधीचीही व्यवस्था करु. याचा फायदा सुमारे 12 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
अखिलेश यादव यांनी घोषणा केली, 'जर सरकार स्थापन झाले तर आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधेसाठी भर देणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कॅशलेस उपचाराची व्यवस्थाही सुरु करु. याशिवाय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वत: जिल्ह्यात नियुक्त केले जाईल. निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव दररोज पत्रकार परिषद घेऊन सपाच्या जाहीरनाम्याची मोठी घोषणा करत आहेत.
The old pension scheme system before 2005 will be restored for the retired employees if Samajwadi Party forms its government in Uttar Pradesh. For a long time, government employees have been demanding restoration of the old pension system: Samajwadi Party chief Akhilesh Yadav pic.twitter.com/8XB7QjCVbU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 20, 2022
समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्यात यश भारती सन्मानाचा समावेश केला जाईल आणि आमचे सरकार आल्यावर पुन्हा यश भारती सन्मान सुरु करु, असे अखिलेश यादव म्हणाले. यासोबतच जिल्हास्तरावर नगर भारती सन्मानही सुरु करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार, व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता आदी नोकरी व रोजगार निर्माण करणाऱ्यांनाही राज्य आणि शहर पातळीवर ही सन्मानपत्रे दिली जाणार आहेत.
अखिलेश यादव दररोज एक घोषणा करत आहेत आणि यापूर्वी बुधवारी त्यांनी गरजू कुटुंबांना वार्षिक 18 हजार रुपये समाजवादी पेन्शन देण्याची घोषणा केली होती. याशिवाय सपा सरकार आल्यास 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही अखिलेश यादव यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 403 विधानसभेच्या जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यूपीमध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागा, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागा, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागा, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागा, सहाव्या टप्प्यात 57 जागा. 3 मार्चला. पण 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांवर मतदान होणार आहे.