स्वतःचे च शेअर विकत घेणार 'ही' आयटी कंपनी, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी...

Wipro Share Buyback: येत्या 27 एप्रिलला विप्रो या मोठ्या बलाढ्य आयटी कंपनीकडून इक्विटी शेअर बायबॅकची (Wipro Buyback news) घोषणा होऊ शकते. त्याचा प्रस्ताव या कंपनीकडून मांडण्यात आला आहे. तेव्हा सर्व गुंतवणूकदारांच्या नजरा या घोषणेवर खिळल्या आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 24, 2023, 05:32 PM IST
स्वतःचे च शेअर विकत घेणार 'ही' आयटी कंपनी, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी... title=
Wipro to announce equity share buyback company has put the purpose results will come out on 27th april

Wipro Q4 Results on 27th April: आयटी क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात उलाढाल होते आहे. मागील वर्ष हे शेअर मार्केटमध्ये बॅंकिंग आणि आयटी क्षेत्रातील होतं असं म्हणायला हरकत नाही. या दोन क्षेत्रात शेअर्स (Wipro News) चांगल्या प्रकारे कामगिरी करत होते. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी निर्माण झाली होती. आता याच क्षेत्रातील एका मोठ्या आयटी कंपनीनं लवकरच शेअर बायबॅकची घोषणा करू शकते. काल कंपनीची बॉर्ड मिटिंग संपन्न झाली. त्या बोर्ड मिटिंगमध्ये विस्तृत काही मुद्द्यावर चर्चा झाली ज्यात पुढील आठवड्यात शेअर बायबॅकचा (Wipro Share Price) जो प्रस्ताव मांडण्यात आला त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे या बॉर्ड मिटिंगमध्ये सांगितले गेले. 

काही दिवसांपुर्वी टीसीएस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस (Infosys) या कंपन्यांनीही त्यांच्या तिमाहीतील निकाल जारी केले होते. त्यांच्या शेअर्समध्येही मोठी चढउतार पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता विप्रो ही तिसरी आयटी कंपनीनं असेल जी या महिन्यात आपल्या तिमाहीतील काही निकाल प्रदर्शित करणार आहे. सध्याचे हे निकाल फारतर समाधानकारक आहेत. त्यातून या कंपनीनं आता शेअर बायबॅकची घोषणा केली आहे जी प्रस्तावही लवकरच मंजूर होईल हेही पाहायला मिळणार आहे. ही कंपनी येत्या 27 एप्रिल रोजी पुन्हा आपल्या निकालांचे प्रदर्शन करेल आणि तेव्हा या प्रस्तावरही निर्णय देईल. 

शेअर बायबॅक म्हणजे काय? 

शेअर बायबॅक (What is Buyback) हा संज्ञा तुम्ही ऐकली असेल. परंतु त्याचा अर्थ आणि वापर नक्की काय असतो आणि त्याचा फायदा आपल्याला कसा होतो? मुळात शेअर बायबॅकचा अर्थ असा की, समजा अमुक एखादी कंपनी ही आपल्याकडे असलेल्या शेअरची संख्या कमी करत असले आणि आपल्या कंपनीतले थकबाकीतले शेअर्स जर का खरेदी करत असेल तर याचा अर्थ ती कंपनी बायबॅकचा विचार करते आहे. या सोप्पा अर्थ असा की ही कंपनी स्वत:तच गुंतवणूक करणार असते परंतु बायबॅकद्वारे.

कंपनी आपलेच थकबाकीतले शेअर हे बाजारभावापेक्षा (Market Price) जास्त किंमतीला खरेदी करते. म्हणजे समजा एका शेअरची कंपनी ही 25 रूपये असेल तर तो शेअर हीच कंपनी 30 किंवा 27 रूपयांनाही खरेदी करू शकते. तो हक्क कंपनीकडे असतो. यातून कंपनी आपल्या भागधारकांना पैसे करत करते. 

हे बायबॅक गुंतवणूकदारांसाठी किती फायदेशीर असते? 

जर एखाद्या कंपनीनं बायबॅक करण्याचा निर्णय घेतला तर त्या कंपनीच्या शेअरच्या किमती या खुल्या बाजारात वाढू शकतील. मुळात या बायबॅकचा हाच उद्देश असतो की शेअरच्या मुल्यांमधील घसरण ही थांबवणे. त्यामुळे याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो. यामुळे गुंतवणूकदारांचाही (Investors) विश्वास वाढतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)