Jio सोबत Google लवकरच भारतात लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन : सुंदर पिचई

वर्षाच्या शेवटी गुगल करणार काही मोठ्या घोषणा

Updated: May 27, 2021, 05:30 PM IST
Jio सोबत Google लवकरच भारतात लॉन्च करणार स्वस्त स्मार्टफोन : सुंदर पिचई title=

मुंबई : Google सीईओ सुंदर पिचई यांनी गुरुवारी Jio सोबत मिळून परवडणारा स्मार्टफोन बनवणार असल्याची घोषणा केली. मागच्या वर्षी Google ने 33,737 कोटी रुपयांसह Jio प्लॅटफॉर्ममध्ये 7.7 टक्के भाग खरेदी केला होता. सोबतच दोन्ही दिग्गज कंपन्यांनी एक कमर्शिअल करार देखील केला होता. ज्यामध्ये एक अफोर्डेबल स्मार्टफोन बनवण्याचा करार देखील आहे.

Google च्या मदतीने घराघरात इंटरनेट

सुंदर पिचई यांनी एशिया पेसेफिकमधील काही पत्रकारांसोबत बोलताना म्हटलं की, आम्ही एक अफोर्डेबल फोन बनवण्यासाठी प्रतिबद्ध आहोत आणि या प्रोजेक्टवर Jio आणि Google एकत्र काम करत आहे. फोनची लॉन्चिंग आणि किंमत याबाबत माहिती दिली नाही. पण त्यांनी हे नक्की केलं की, हा फोन स्वस्त डेटासोबत लॉन्च होईल. ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचेल. Google ने Jio प्लॅटफॉर्ममध्ये Google इंडिया डिजिटाइजेशन फंड गुंतवला आहे. ज्याची घोषणा मागच्या वर्षी झाली होती. 

मागच्या वर्षी जुलैमध्ये सुंदर पिचई यांनी 5 वर्षात 75,000 रुपयांच्या गुंतवणूकीची योजना सांगितली होती. ज्यामुळे देशात डिजिटायजेशनला आणखी मदत होणार आहे.

Google करणार मोठी घोषणा

Google कडून इंडिया डिजिटायजेशन फंड (IDF) मध्ये 10 बिलियन डॉलर दिले जावू शकतात. वर्षाच्या शेवटी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात. सुंदर पिचई यांनी कोविड-19 मुळे लोकांच्या जीवनातील टेक्नोलॉजीची गरज हायलाईट केली आहे. आम्ही Google Meet ला या महामारीच्या दरम्यान लॉन्च केलं. सोबतच सर्वांना परवडेल अशा किंमतीत स्मार्टफोन आणि कंप्यूटर आणण्याच्या दिशेने काम करत आहोत. 

सुंदर पिचई यांनी Google I/O 2021 कार्यक्रमात काही आगामी योजनांची देखील माहिती दिली. ज्या येत्या काही दिवसात लॉन्च होतील. ज्यामध्ये नवीन प्रायव्हसी सेटिंग, नवीन AI टूल, अँड्राईड 12 सॉफ्टवेअर अपडेट यांचा समावेश आहे.