गाय घमाघमा दूध देते, हा व्हीडिओ पाहा, ''हंबरुनी लेकराला चाटते जेव्हा गाय''

कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. आपल्याकडे जुगाडी लोकांची काही कमी नाही.

Updated: Jan 14, 2022, 09:01 PM IST
गाय घमाघमा दूध देते, हा व्हीडिओ पाहा, ''हंबरुनी लेकराला चाटते जेव्हा गाय''
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : कोण कधी काय करेल, याचा नेम नाही. आपल्याकडे जुगाडी लोकांची काही कमी नाही. एखाद्या गरजेवर असा काही जालीम तोडगा काढला जातो, की तोड जुगाड पाहून दाताखाली बोटं दाबून धरण्याशिवाय पर्याय राहत नाही. असाच काही जुगाड एका महिलेने केला आहे. गाईने निट दूध द्यावं यासाठी तिने जे काही केलंय, ते पाहून तुम्हीही हा व्हीडिओ पाहत रहाल. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (woman jugaad to get cow milk video viral on social media)

साधारणपणे दूध काढताना जनावरं निट दूध काढून देत नाहीत. दूध काढणारी व्यक्ती गाईसाठी नवखी असली तर झालंच समजा. यावर अनेक जण दूध काढताना गाईसमोर तिच्या वासराला ठेवतात. जेणेकरुन गाईने नीट दूध द्यावं. पण यावर या महिलेने अशी युक्ती लढवली की सर्व प्रश्नच निकाली निघाले. 

या महिलेने चक्क लहान मुलालाच वासरु म्हणून गाईसमोर बसवलं. या व्हीडिओमध्ये गाय त्या मुलाला वासराप्रमाणे माय करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही महिला सहजपणे दूध काढत आहे. दरम्यान हा व्हीडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.