रोज सकाळी चहासोबत टोस्ट खाताय? कामगारांचा VIDEO पाहून आत्ताच खाणं सोडाल

Rusk Making Viral Video: चहासोबत टोस्ट खाणे प्रत्येकाला आवडते. पण तुम्हाला माहितीये का टोस्ट कसा बनवला जातो.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 22, 2023, 01:22 PM IST
रोज सकाळी चहासोबत टोस्ट खाताय? कामगारांचा VIDEO पाहून आत्ताच खाणं सोडाल title=
working making rusk with unhygienic process video goes viral

Rusk Making Viral Video: अनेकांची सकाळ चहाशिवाय अपूर्ण असते. सकाळ-सकाळ उठल्यावर चहाचा कपहा हवाच पण फक्त चहा पिण्याबरोबरच बिस्किट किंवा टोस्ट-खारी खाण्याची सवय असते. घरी पाहुणे आल्यावरही आपण त्यांना चहासोबत टोस्ट सर्व्ह करतो. आता टोस्टमध्येही वेगवेगळे प्रकार बनवले जातात. वेलची, क्रिस्पी, स्वीट असे वेगवेगळे टोस्ट बनवले जातात. लहान मुलांबरोबर तरुण मंडळी ते मोठी माणसंही मोठ्या आवडीने टोस्ट खातात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात टोस्ट कशा पद्धतीने बनवले जात आहेत. हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील टोस्ट खाण्याआधी दहावेळा विचार कराल. 

सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा फुड ब्लॉगरही असेच काहीसे व्हिडिओ पोस्ट करत असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ (@Ananth_IRAS) नावाच्या अधिकाऱ्याने शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, जर हे खर असेल तर पुन्हा टोस्ट खाताना मला भीती वाटेल. 35 सेंकदाच्या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की तीन ते चार कामगार अस्वच्छ अवस्थेत टोस्टसाठीचे पीठ तयार करत आहेत. 

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या भांड्यात काही साहित्य एकत्रित केली आहेत. त्यानंतर एक व्यक्ती हातानेच हे सर्व साहित्य एकत्रित करत आहेत. त्यासोबत त्याच्या हातात सिगारेट असल्याचेही दिसत आहे. नंतर, तीन ते चार जण हे पीठ हाताने मळताना दिसत आहेत. यावेळी हातात ग्लोव्ह्सदेखील घातलेले दिसत नाहीयेत. तसंच, ज्या ठिकाणी हे टोस्ट तयार करण्यात येत आहेत. ती जागही अस्वच्छ आहे. एका लादीवर पीठ मळलं जात आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छतेची काळजी इथे करण्यात आलेली नाहीये. 

युजर्सच्या कमेंट

20 नोव्हेंबर रोजी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 6 लाखाहून जास्त व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. एकाने म्हटलं आहे की, या पेक्षा स्वतःच ब्रेड बेक करणे खूप सोप्प आहे. तर, दुसऱ्या एकाने म्हटलं आहे की, त्यांनी हात हात कुठे वापरले असतील याचा मला विचारच करायचा नाहीये. तर, तिसऱ्या एकाने म्हटलं आहे की, इतक्या तापमानात बॅक्टेरिया मरुन जातात.