10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

साऊथ सुपरस्टार तलपती विजयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे या व्हिडीओत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 1, 2024, 04:23 PM IST
10 च्या विद्यार्थिनीसोबत फोटो काढताना साऊथच्या सुपरस्टारने खांद्यावर हात.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल  title=

साऊथचा सुपरस्टार तलपती विजयची फॅन फॉलोइंग कोणापासून लपलेली नाही. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. दरम्यान, एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 10वी च्या वर्गातील एक विद्यार्थिनी सुपरस्टारचा हात तिच्या खांद्यावरून काढताना दिसत आहे. हा एवढाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत आहे. 

हा व्हिडिओ अपूर्ण असल्याने चाहते याबद्दल नाराज आहेत. तमिलगा वेत्री कळघमने आयोजित केलेल्या दुसऱ्या वार्षिक शैक्षणिक पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तालपती विजय नुकतेच चेन्नई येथे पोहोचले होते. जिथे 10वी आणि 12वी मधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुपरस्टारच्या हस्ते गौरव करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

क्लिपमध्ये दहावीचा विद्यार्थीनीला तलपती पुरस्कार देताना दिसत आहे. यामध्ये विद्यार्थिनीला शाल घातल्यानंतर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर त्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यात आलं. यानंतर फोटो काढताना तलपती विजयने त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. हा व्हिडीओमधील एवढाच भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मात्र, हा अपूर्ण व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली असून सोशल मीडिया युजर्स एडिट केलेल्या व्हिडिओवर टीका करताना दिसत आहेत.

याशिवाय चाहत्यांनी संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तलपती विद्यार्थ्यासोबत पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत चाहत्यांनी लिहिले की, तुम्ही अर्धा व्हिडिओ कापला आहे. हे हेतुपुरस्सर होते किंवा तुम्हाला वाटले की, तुम्हाला जे हवे होते ते मिळाले. दुसऱ्या युझरनेते घेतले.