World Environment Day 2024 : वनतारियन चळवळीत सहभागी होण्याची शपथ घ्या

World Environment Day 2024 : वनतारियन (Vantarian) चळवळ म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी उपेक्षित संधी तयार करणे आहे.

Updated: Jun 5, 2024, 07:58 PM IST
World Environment Day 2024 : वनतारियन चळवळीत सहभागी होण्याची शपथ घ्या title=
Vantarian

World Environment Day 2024 : पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची संक्लपना आणि मानवी भविष्याची वाटचाल या दोन्हींचा सुवर्णमध्य शोधताना आपल्याला हरित युगाकडे पाऊलं टाकायची आहेत. लहान लहान गोष्टीमधून किंवा एखादी सातत्यपूर्ण कृती स्वीकारून आपण पृथ्वीसाठी महत्त्वपूर्ण सकारात्मक बदलांमध्ये योगदान देऊ शकतो. अशातच या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, निसर्ग आणि वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असलेला Vantarian समुदायासोबत आपण चळवळीत सहभागी होऊ या.

Vantarian चळवळ म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करणाऱ्या सजग गोष्टींची निवड करणे. दैनंदिन घडामोडींमध्ये आपण आणल्या सवयी किंवा पर्यावरणपूरक लहान कृती असा अंगीकृत करू शकतो. अशा कृतींचा एकत्रितपणे महत्त्वपूर्ण परिणाम होतोय. आमच्या मित्रांनी Vantarian बनण्याची प्रतिज्ञा घेऊन सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे. निसर्ग आणि वन्यजीवांच्या संवर्धनाला मदत करणाऱ्या नवीन सवयी अंगीकारण्यातं वचन त्यांनी घेतलंय. ही फक्त एक कृती नसून एक चळवळ आहे, जी आत्मविश्वासाने चालवली जाते. ज्यामुळे परिसराच्या शाश्‍वत विकासासाठी आवश्यक कृती अंगाकृत केली जाते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vantara Reliance (@vantara)

तुम्हालाही Vantarian व्हायचं असेल तर तुम्ही प्रतिज्ञेपासून सुरूवात करू शकता. Vantarian चा फिल्टर वापरून तुम्ही प्रतिज्ञा करा. त्याचबरोबर पर्यावरणपूरक सवयी स्विकारा. यामध्ये तुम्ही #ImAVantarian आणि #Vantara यासारखे हॅशटॅग वापरून चळवळीत सामील होऊ शकता. सोशल मीडियावर तुम्ही चळवळीला बळ दिल्याने अनेकजण प्रेरित होऊ शकतात. जितकी जास्त लोक चळवळीशी जोडले जातील, तेवढी चळवळ अधिक प्रभावी ठरू शकते.

बघताय काय...! सामील व्हा

जग जिंकण्यासाठी आहे आणि संरक्षण करण्यासाठी देखील आहे. त्यामुळे आजच प्रतिज्ञा करता आणि Vantarian व्हा. आपण एकत्रितपणे एक चळवळ उभारू शकतो जी केवळ जागरुकता वाढवत नाही तर वास्तविक बदल घडवून आणू शकते. यंदाचा हा जागतिक पर्यावरण दिन आपल्या पृथ्वीसाठी एक प्रेरक असा साजरा करूया.

दरम्यान, तुमच्या कृतीतून आणि सवयीमधून तुम्ही बदल घडवण्यासाठी तयार आहात का? आजची प्रत्येक छोटी कृती उद्या मोठ्या प्रभावासाठी योगदान देतो. मी Vantarian बनण्याची आणि हरित भविष्यासाठी योगदान देण्याची शपथ घेतो. तर तुम्ही माझ्यासोबत शपथ घ्या. मी Vantarian आहे, निरोगी पृथ्वीसाठी योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे. तुम्ही पण आहात का? स्वतः वनतारियन होण्यासाठी फिल्टर वापरा.