World Lion Day : सिंह हा जंगलाचा राजा का असतो? IFS अधिकाऱ्यामुळं सर्वांनाच मिळालं याचं उत्तर

आपल्याला लहानपणापासून माहित आहे की जंगलाचा राजा सिंह आहे. अॅनिमेटेड (animated) चित्रपटांमधे किंवा कार्टून्स मध्येही आपण पाहिलं असेल, की जंगलाचा राजा कायम सिंहच असतो. पण, असं का? हा प्रश्न पडलाय का तुम्हाला?

Updated: Aug 11, 2022, 11:37 AM IST
World Lion Day : सिंह हा जंगलाचा राजा का असतो? IFS अधिकाऱ्यामुळं सर्वांनाच मिळालं याचं उत्तर title=

मुंबई : आपल्याला लहानपणापासून माहित आहे की जंगलाचा राजा सिंह आहे. अॅनिमेटेड (animated) चित्रपटांमधे किंवा कार्टून्स मध्येही आपण पाहिलं असेल, की जंगलाचा राजा कायम सिंहच असतो. पण, असं का? हा प्रश्न पडलाय का तुम्हाला?

जागतिक सिंह दिनानिमित्त भारतीय वन सेवेचे अधिकारी प्रवीण कासवान यांनी सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात? असा प्रश्न विचारला आणि ट्विटरवर युजर्सनी मजेशीर उत्तरं  दिली आहेत.

जागतिक सिंह दिन 2022 निमित्त IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विट केले. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'सिंहच का असतो जंगलाचा राजा?' असा प्रश्न सोशल मीडियावर युजर्सना विचारला. त्यानंतर युजर्सनीही या प्रश्नावर मजेशीर उत्तरे दिली. अनेकांची उत्तरे विनोदाने सुसज्ज होती.

IFS प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'सिंह हा जंगलातील सर्वात मोठा प्राणी नाही किंवा सर्वात बलवानही नाही. मग त्याला जंगलाचा राजा का म्हटले जाते?, बघूया कोण याचे उत्तर देणार?

यावर यूजर्सने उत्तर दिले की, " सिंह हा मरेपर्यंत लढा देत असतो. तसेच आतापर्यंत सिंहाला त्याच्या प्रतिस्पर्ध्याने हल्ला करून ठार मारले आहे असे फार कमी ऐकाला मिळालं. सिंहांचा नैसर्गिक मृत्यू होतो.

तर दुसऱ्या यूजर्सने उत्तर दिले की,  सिंहाला इतर कोणत्याही प्राण्याने मारल्याचे कधीच ऐकले नाही. म्हणूनच त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते. पण ते जंगलात कधीच राहत नाहीत कारण Attitude?

तसेच  IFS अधिकारी प्रवीण कासवान यांना ट्विटरवर अनेक युजर्सचा प्रतिसाद आला असून सिंहाच्या वृत्तीमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते असे देखील म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं, का असेल सिंह जंगलाचा राजा?