नवी दिल्ली : खाण्या-पिण्याचे शौकिन लोक पदार्थाची चव लाजवाब असली तर अनेकदा पैशाचा विचार करत नाहीत. खाण्या-पिण्याच्या अशाच शौकिन लोकांसाठी सोन्याचा पिझ्झा बनवण्यात आला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना? पण खरंच जगातील सर्वात महागडा सोन्याचा पिझ्झा बनवण्यात आला आहे.
पिझ्झ्याचं नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेक प्रकारच्या चटण्या, पनीर, चिज, मस्का, व्हेज, नॉनव्हेज आणि विविध प्रकारच्या टॉपिंगसह बनवलेला पिझ्झा अनेकांनी खाल्ला असेल. पण कधी सोन्याचा पिझ्झा खाल्लाय का? न्यूयॉर्कमधील एका हॉटेलमध्ये सोन्याचा पिझ्झा बनवण्यात आला आहे.
न्यूयॉर्कच्या 'इंडस्ट्री किचन' (Industry Kitchen) हॉटेलमधील मेन्यूमध्ये वुड फायर्ड पिझ्झा (WOOD FIRED PIZZA) आणि सिग्नेचर पिझ्झा (SIGNATURE PIZZA) नावाने पिझ्झाच्या १४ व्हरायटी सादर करण्यात आल्या. यात सोन्यापासून बनलेला पिझ्झा 'जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड २४ कॅरेट' (Guinness World Record 24K) नावाने देण्यात आला.
'इंडस्ट्री किचन'मध्ये Gold pizza तयार करण्यासाठी विशेष तयारी करण्यात येते. या पिझ्झामध्ये चिली फ्लेक्सच्या जागी सोन्याचे फ्लेक्स टाकण्यात येतात. या पिझ्झासाठी इंग्लंडमधून पनीर तर फ्रान्समधून मीट मागवून ते टाकण्यात येतं.
जानें, क्या है इस ₹1.5 लाख के पिज्जा की खासियत?#Pizza pic.twitter.com/3EKE5I4Hov
— Zee Business (@ZeeBusiness) December 5, 2019
हा पिझ्झा तंदूरमध्ये लाकडाच्या आगीवर तयार केला जातो. यानंतर त्यावर २४ कॅरेट सोन्याचा वर्ख लावला जातो आणि महागड्या फूलांच्या पाकळ्यांनी तो सजवला जातो.
या पिझ्झाची किंमत जवळपास १.५ लाख रुपये इतकी आहे.