Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. 'जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,' असे ते पोस्टमध्ये म्हणतात.
खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान, सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने त्यांना लिफ्ट दिली आणि ते इच्छितस्थळी पोहोचू शकले,असे महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिले.
अचानक एखादा ओळखीचा माणूस दुसऱ्या शहरात दिसला तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. असेच काहीसे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांच्या बाबतीत घडले. वॉशिंग्टनमध्ये कॅब बुक करत असताना दोघांची भेट भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्याशी झाली.
I suppose this was what they would call a ‘Washington moment.’ After the tech handshake meeting yesterday, Mukesh Ambani, Vrinda Kapoor & I were continuing a conversation with the Secretary of Commerce & missed the group shuttle bus to the next lunch engagement. We were trying… pic.twitter.com/gP1pZl9VcI
— anand mahindra (@anandmahindra) June 25, 2023
मुकेश अंबानी आणि अमेरिकेचे कॉमर्स सचिवांशी बोलत असताना माझी शटल सुटली. मी उबर बुक करत होता. यावेळी मला सुनीता विल्यम्स दिसल्याचे महिंद्रा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा पंतप्रधान मोदींसोबत अमेरिकेच्या स्टेट डिनरसाठी वॉशिंग्टनला गेले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी या अधिकृत डिनरचे आयोजन केले होते. या स्टेट डिनरसाठी भारतातील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. यात अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांच्या पत्नी, सत्या नडेला आणि इंदिरा नूयी यांनीही हजेरी लावली होती.