नवी दिल्ली : तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची आहे? आणि पैसा लवकरात लवकर दुप्पट करायचा आहे? तर मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात एक माहिती देणार आहोत.
आपल्याकडे पैसा असावा आणि असलेला पैसा लवकरात लवकर दुप्पट व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. यासाठी प्रत्येकजण आपली काहीतरी योजना आखतं. कुणी स्कीममध्ये पैसा गुंतवतं तर कुणी बँक अकाऊंटमध्ये ठेवतं.
पण, अनेकांना माहिती नसतं की पैसे कुठं आणि कशा प्रकारे दुप्पट होणार. सर्वाधिक वेगाने म्युचअल फंडमध्ये पैसे लवकर डबल होतात. मात्र, अनेकांना यामध्ये पैसा गुंतवणं योग्य वाटत नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं त्यांना धोकादायक वाटतं. त्यामुळे नागरिकांकडे बँक आणि पोस्ट ऑफिस हे दोनच पर्याय शिल्लक राहतात.
पण, पोस्ट ऑफिसमध्ये पैसे लवकर डबल होणार की बँकेत होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पैसे कुठं गुंतवल्यास किती फायदा होईल. बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवल्यास ते लवकर दुप्पट होतील.
बँकेत FD केल्यास नागरिकांना आपली रक्कम दुप्पट होण्यास १२ वर्ष लागू शकतात. एसबीआय सध्या ५ ते १० वर्षांच्या एफडीवर ६ टक्के व्याज देतं. या दरात गुंतवणूक केलेली १ लाख रुपयांची रक्कम १२ वर्षांत दोन लाख रुपयांपेक्षा काहीशी जास्त मिळेल.
बँकेच्या तुलनेत पोस्टात पैसा लवकर दुप्पट होईल. पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये सध्या ७.६ टक्के व्याज दर आहे. टाईम डिपॉझिट जास्तित जास्त ५ वर्षांसाठी केली जाते. म्हणजेच तुम्ही ७.६ टक्के दराने ५ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले तर १० वर्षांत २ लाख रुपयांहून अधिक रक्कम तुम्हाला मिळेल.