Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Sunil Desale Updated: Mar 29, 2018, 06:28 PM IST
Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण title=

नवी दिल्ली : एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

तरुणाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या तरुणाला घेरुन काही नागरिक मारहाण करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील असल्याचं बोललं जात आहे. ही संपूर्ण घटना तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 

बेल्ट आणि काठ्यांनी बेदम मारहाण

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जवळपास १० तरुणांनी एका मुलाला झाडाला बांधून ठेवलं आहे आणि त्याला बेल्ट-काठ्यांनी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. इतकचं नाही तर हे तरुण शिव्याही देत आहेत, कुणी तरुणाचा हात तोडण्याचा प्रयत्न करत आहे तर कुणी त्याचे केस ओढण्याचा प्रयत्न करत आहे.

'तो' सुटकेसाठी प्रयत्न करत होता मात्र...

हा तरुण स्वत:ची सुटका करण्यासाठी आतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. तसेच सुटकेसाठी या आरोपींकडे भिक मागत आहे मात्र, आरोपींना कुठल्याही प्रकारची दया या तरुणावर आली नाही.

या दबंग तरुणांनी गुंडागर्दी इथेच थांबली नाही. तर, त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत तो व्हायरलही केला. या घटनेनंतर पोलिसांनी पीडित तरुणाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते, पीडित तरुण हा सदर कोतवाली येथील रौनियार परिसरात राहणारा आहे आणि आपल्या काकांच्या दुकानात काम करतो.