आग्रा : सैन्यात नोकरी लागली नाही म्हणून एक तरुण निराश झाला. त्याने नैराश्याच्याभरात आत्महत्या केली. या तरुणाने स्वत:ला फाशी लावत फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ सुरु केला. दरम्यान, ही बाब मित्रांना समजतात तू असे काही करु नकोस, अशी विनंती पोस्ट केली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या तरुणाने स्वत:ला गळफास लावत सोशल मीडियावरुन आत्महत्या केली.
हे प्रकरण आग्रामधील न्यू आग्रा पोलीस स्टेनच्या रेणुका विहार कॉलनीत घडले. बीएससी उत्तीर्ण तरुण मुन्ना कुमार हा सैन्यात नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत होता. सैन्यात नोकरी करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, सैन्यात नोकरी करण्याचे वय त्याचे संपत होते. त्यामुळे तो तणावात होता. तो जीवनाची लढाई गमावून बसला. तो नेहमी उदास राहायचा. या नैराशात त्याने स्वत:ला संपवून टाकले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठीही लिहीली आहे.
दोन पानांच्या सुसाईडनोटमध्ये त्याने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. मी आई-वडिलांचा वेदना दिल्या आहेत. तसेच त्याने शेवटी जय हिंद असे या चिठ्ठीत लिहिलेय. ज्यावेळी घरातील सदस्य झोपी गेले त्यावेळी त्याने आत्महत्या करण्याची तयारी सुरु केली. त्याने फाशी लाईव्ह करत व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. फेसबुकवर व्हिडिओ पाहिल्यानंतर ही घटना उघड झाली. मुन्नाच्या आत्महत्येमुळे घरातील लोकांना जबर धक्का बसलाय.
मुन्नाच्या नातेवाईकांनी सांगितले की, मुन्नाला सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करावयाची होती. जेव्हा त्याच्या सैन्याची निवड करण्यात आली नाही, तेव्हा त्यांने आत्महत्या केली. पोलिसांनी मुन्नाचा देह पोस्टमार्टममध्ये पाठविला आहे. पोलिसांनी फेसबुकवर व्हिडिओचा तपास करीत आहेत.