Youtuber Tax: यूट्यूबच्या माध्यमातून कमाई करुन टॅक्स न भरणं यूट्युबर्सना महागात पडलं आहे. यासंदर्भातील एक बातमी केरळमधून समोर आली आहे. येथे आयकर विभागाने 10 यूट्यूबर्सच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. अनेक आघाडीच्या अभिनेत्री आणि युटूबर्सची नावे आयटीच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.
सुमारे 10 लोकप्रिय यूट्यूबर्सवर छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. सर्व युट्यूब कंटेट क्रिएटर वर्षाला एक ते दोन कोटी कमावतात पण कर भरत नाहीत. या यूट्यूबर्सपैकी ३ आघाडीच्या आणि इतर काही यूट्यूबर्सवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. कोझिकोड आणि कोची या दोन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या सर्व YouTubers मध्ये सर्वात प्रसिद्ध असलेल्या युट्युबर्स मुलीला 2.5 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तिने टीव्ही होस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 'D4 डान्स' द्वारे घराघरात प्रसिद्ध झाली.
भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही उत्पन्नाचा काही भाग सरकारला कर म्हणून भरावा लागतो, वेगवेगळ्या उत्पन्नांवर वेगवेगळे कर असतात, ज्याची माहिती सरकारला द्यावी लागते आणि कर भरावा लागतो.
तुम्हाला 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नाही, परंतु 3 लाख ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान तुम्हाला 5% कर भरावा लागेल. 6 लाख ते 9 लाख रुपयांच्या दरम्यान, 10 टक्के कर आकारला जातो, तर 9 लाख रुपये ते 12 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी तुम्हाला 20 टक्के कर भरावा लागतो. तर 15 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल. 30 टक्क्यांपर्यंत कर भरावा लागतो.