'भारतीय मुस्लिम जगातील सर्वात निर्लज्ज लोक'... मूसानं ओकली गरळ!

हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्याचा अलकायदाचा दहशतवादी झाकीर मूसा यानं पुन्हा एकदा गरळ ओकलीय. 

Updated: Jun 6, 2017, 09:13 PM IST
'भारतीय मुस्लिम जगातील सर्वात निर्लज्ज लोक'... मूसानं ओकली गरळ! title=

नवी दिल्ली : हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्याचा अलकायदाचा दहशतवादी झाकीर मूसा यानं पुन्हा एकदा गरळ ओकलीय. 

भारतातील मुसलमान जगातील सर्वात निर्लज्ज लोक असल्याचा दावा, मूसानं केलाय. मूसानं सोमवारी टेलिग्राम आणि व्हॉटसअप ग्रुपवर एक ऑडिओ रेकॉर्डिंग जाहीर केलीय. यामध्ये त्यानं 'गजवा ए हिंद'साठी जिहादमध्ये सहभागी न झाल्यानं भारतीय मुसलमानांबद्दल द्वेष व्यक्त केलाय. 

'ही लढाई केवळ काश्मीरपर्यंत मर्यादीत नाही तर इस्लाम आणि काफिरांमधली ही लढाई आहे... भारतीय मुस्लिम जगातील सर्वात बेशरम मुस्लिम आहेत. त्यांना स्वत:ला मुस्लिम म्हणवण्यात लाज वाटायला हवी...' असं म्हणत त्यानं भारतीय मुसलमानांबद्दल अनुद्गार काढलेत.