ZEE NEWS पुन्हा अग्रेसर, देशातील विश्वासार्ह चॅनेल तर सुधीर चौधरी सर्वात विश्वासू सीईओ

ZEE NEWS ने पुन्हा एकदा देशातील सर्वात विश्वासार्ह चॅनेल बनण्याचा मान मिळवला आहे.

Updated: May 28, 2022, 08:11 PM IST
ZEE NEWS पुन्हा अग्रेसर, देशातील विश्वासार्ह चॅनेल तर सुधीर चौधरी सर्वात विश्वासू सीईओ title=

नवी दिल्ली : ZEE NEWS ने देशातील सर्वात विश्वासार्ह चॅनेल बनण्याचा मान पुन्हा एकदा मिळवला आहे. एवढेच नव्हे तर ZEE NEWS चे सीईओ सुधीर चौधरी यांना 'मोस्ट ट्रस्टेड सीईओ'चा बहुमान मिळाला आहे.

Idea Fest 2022 मध्ये ZEE NEWS ला देशातील सर्वात विश्वासार्ह चॅनल म्हणून निवडण्यात आले आहे. पत्रकारितेचा मजबूत आधारस्तंभ म्हणून ZEE NEWS कडे नेहमीच आदराने पाहिले जाते. यामुळेच झी न्यूज नेहमीच प्रेक्षकांची पहिली पसंती राहिली आहे.

'सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पुरस्कार'

हा पुरस्कार स्वीकारताना सीईओ सुधीर चौधरी म्हणाले की, हा पुरस्कार मिळाल्याचा सर्वात जास्त आनंद वाटत आहे. कारण, माध्यमांचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे प्रेक्षक. आमचे कोणतेही प्रेक्षक आम्हाला कुठेही भेटतात आणि आम्हाला तुमचे चॅनल पाहायला आवडते असे सांगतात. तोच आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो. पुरस्कारांवर माझा फारसा विश्वास नाही कारण ही पद्धत फारशी पारदर्शक नाही,असेही ते म्हणाले.

देशाची पहिली उपग्रह वाहिनी 'झी' वाहिनी

ZEE MEDIA ही देशातील सर्वात जुनी मीडिया संस्था आहे. 1992 मध्ये आम्ही देशातील पहिले उपग्रह चॅनेल सुरू केले आणि आता ZEE MEDIA हे देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या मीडिया पोर्टफोलिओपैकी एक असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही सीईओ सुधीर चौधरी यांनी सांगितले.