डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने दिला असा सन्मान, VIDEO पाहून धक्काचं बसेल

पाहा VIDEO: जावयाचं नाही तर डिलिव्हरी बॉयचं...कपाळावर टीळा लावत आरती करून स्वागत, ग्राहकाने असं का केलं 'हे' वाचून धक्का बसेल 

Updated: Oct 8, 2022, 10:12 PM IST
डिलिव्हरी बॉयला ग्राहकाने दिला असा सन्मान, VIDEO पाहून धक्काचं बसेल title=

नवी दिल्ली : देशभरातून सध्या डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) संदर्भातल्या अनेक बातम्या समोर येत आहे. यामध्ये काही ठिकाणी महिलांशी छेड काढल्याचा, तर काही ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थितीत जेवण पोहोचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता एक अशी घटना समोर आली आहे. ही घटना एकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. नेमकी ही काय घटना घडलीय, हे जाणून घेऊयात.  

आजकाल ऑनलाइनचे युग आहे. त्यामुळे लोकांना कोणत्याही क्षणी काहीही खावेसे वाटले की ते ऑनलाइन ऑर्डर (Online Order) करून डिलिव्हरी बॉयद्वारे (Delivery Boy) ते जेवण स्विकारू शकतात. गेल्या अनेक वर्षापासून अशाप्रकारचे जेवण मागवण्याच्या घटना वाढल्या आहेत. 

व्हिडिओत काय?
व्हिडिओत (Viral Video) तुम्ही पाहु शकता, एक डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) ग्राहकाचे जेवण घेऊन घरी आला. हे जेवण स्विकारण्याऐवजी ग्राहक त्याची आरतीचे ताठ घेऊन वाट पाहतोय. ग्राहक घराजवळ पोहोचताच त्याच्या कपाळावर प्रथम टीळा लावला जातो, नंतर तांदूळ टाकून त्यांची आरती केली जाते. डिलिव्हरी बॉयचं (Delivery Boy) असं स्वागत पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

दरम्यान हा व्हिडिओ (Viral Video) पाहून डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) इतका सन्मान का दिला गेला, असा प्रश्न सहाजिक सर्वांना पडला असेल. तर यामागचे कारण म्हणजे 4 तास उशिरा जेवणाची ऑर्डर दिल्याने ग्राहकाने या डिलिव्हरी बॉयचं असं स्वागत केलं आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

खरं तर डिलिव्हरी बॉय (Delivery Boy)  जेवण घेऊन उशिरा पोहोचतो, कारण तो दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये खूप अडकला होता आणि वरून पाऊस पडतोय. सामान्यत: अशा परिस्थितीत डिलिव्हरी बॉयला ग्राहकांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात, पण इथे मात्र त्याचा सन्मान करण्यात आल्याचे पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sanjeevkumar220268 नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत  59 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 5 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. तसेच या व्हिडिओवर भन्नाट कमेंट येत आहेत. एका युझरने, 'तुम्हाला काय बघायचं आहे...माझ्या शहरात झोमॅटो नाही हे चांगलं आहे' अशी मजेशीर कमेंट केली आहे.आणखी एका युझरने हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ (Viral Video)  सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.