Mumbai Goa Highway Accident : लग्न सोहळ्यासाठी (marriage) निघालेलेल वऱ्हाडी लग्न मंडपाऐवजी रुग्णालयात पोहचले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघतात तब्बल 25 जखमी झाले आहेत. स्थानिक तातडीन अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले. यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिलसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबई गोवा महामार्गवर वागदे येथे बोलेरो पिकअपला हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरचा वाहनावरील कंट्रोल सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघात सुमारे 25 प्रवासी जखमी झालेत. कुडाळ येथून बोलेरो पिकअपमधून लग्नाचे वऱ्हाड लग्न सोहळ्यासाठी देवगडच्या दिशेने निघाले होते. यामध्ये तब्बल 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात घडताच स्थानिकांनी तात्काळ जखमींना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर हा अपघात झाला आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. या पिकअप मध्ये सुमारे 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात जवळपास २५ पेक्षा अधिकजण जखमी झाले असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात अनेकांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली असून घटनेची माहिती मिळताच महामार्गावरून जाणाऱ्या वागदे सरपंच संदीप सावंत, राजा पाटकर यांनी जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णालयात भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी जि.प. उपाध्यक्ष रंजन राणे, हृतिक नलावडे, यांच्यासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. अनेक अनेकांना गंभीर इजा झाली असून रक्तबंबाळ अवस्थेत प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाडा भिवंडी रोडवर कुडूस जवळील कोकाकोला कंपनी जवळ एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 20 पेक्षा जास्त प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना कुडूस मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पालघर स्वारगेट बस 62 प्रवाशी प्रवास करीत असताना बसणने मागून एका ट्रेलरला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.