मुंबई-गोवा महामार्गावर १९ ते २२ ऑगस्टच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी

या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू , रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. 

Updated: Aug 14, 2020, 07:40 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर १९ ते २२ ऑगस्टच्या कालावधीत अवजड वाहनांना बंदी title=

रायगड: गणेशोत्सवासाठी रस्तेमार्गाने कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

बाप्पा पावला, कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा

यामध्ये १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू , रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. याशिवाय, २८ ऑगस्ट सकाळपासून ते २९ ऑगस्ट या कालावधीतही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुन्हा बंदी घातली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. 

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही विरोध नाही, पण...

यंदा कोरोनाचे संकट असूनही चाकरमनी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत. आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोक बाहेरून कोकणात दाखल झाले आहेत. आगामी काही दिवसांत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. चाकरमन्यांना कोकणात जाण्यासाठी विशेष एसटी बसेसची सोय यापूर्वीच करण्यात आली होती. तसेच आज कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा आज करण्यात आली. ५ ऑगस्टला पहिली गाडी सुटणार आहे. ती १६ ऑगस्टला कोकणात दाखल होईल. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या १६२ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.  ८१ अप तर ८१ डाऊन गाड्या धावतील.