konkan railway mega block News In marathi : कोकण रेल्वे मार्गावरील वीर आणि अंजनी स्थानकांदरम्यान पायाभूत कामासाठी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी आज (23 जानेवारी 2024) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील दुरुस्तीचे कामे अडीच तास सुरु राहणार असून दुपारी 13:10 ते 15:40 पर्यंत ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण 3 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. परिणामी प्रवाशांचा जादा वेळ हा प्रवासातच जाणार आहे.
आज, एलटीटीईहून सुटणारी तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेस क्रमांक 16345 कोलाड-वीर सेक्शन दरम्यान 40 मिनिटे थांबवली जाणार आहे. तर सावंतवाडी रोडवरून सुटणारी गाडी क्रमांक 10106 दिवा एक्स्प्रेस रत्नागिरी-चिपळूण दरम्यान एक तास थांबवण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक 02197 कोईम्बतूर जंक्शन. जबलपूर एक्स्प्रेस मंगळवारी रत्नागिरी-चिपळूण दरम्यान 45 मिनिटे थांबणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.
कोकणातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी तसेच या परिसराचा विकासासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याची मागणी वाढत आहे. यासंदर्भात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने निवेदने दिली आहेत. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे कोकण रेल्वे लवकरच भारतीय रेल्वेत विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.