मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात झालाय. 

Updated: Aug 27, 2018, 09:47 AM IST

रायगड :  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात झालाय. या अपघातात ८ जण जखमी झालेत. त्यापैकी तिघे गंभीर जखमी झालेत. मुंबईकडे जाणाऱ्या क्रूझर जीपने ट्रेलरला मागून धडक दिली. खालापूर तालुक्यात धामणी इथे हा अपघात झालाय. मात्र द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

जखमींवर उपचार 

सकाळच्या वेळेत मुंबईच्यादिशेने येणाऱ्या ट्रेलरला क्रूझरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. प्राथमिक वृत्तानुसार ८ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या अपघाताचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.