close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रदीप शर्मा यांच्यासोबत गुंडांच्या गाड्या; बविआचा आरोप

प्रदीप शर्मा यांनी २५ ते ३० कोटी रूपये वाटल्याचा आरोप

Updated: Oct 20, 2019, 11:09 PM IST
प्रदीप शर्मा यांच्यासोबत गुंडांच्या गाड्या; बविआचा आरोप

नालासोपारा: नालासोपाऱ्यात बविआच्या कार्यकर्त्यांनी प्रदीप शर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर बाविआ व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी प्रदीप शर्मा यांच्यासोबत काही गुन्हेगारांच्या गाड्या असल्याचा आरोप बविआचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांच्यासाठी निवडणूक म्हणजे निव्वळ खेळ असल्याचेही त्यांनी म्हटले. 

नालासोपाऱ्यातील निळेमोरे परिसरात शनिवारी रात्री ११ वाजता प्रदीप शर्मा यांच्या गाड्यांचा ताफा आला होता. यामध्ये मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप बाविआच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे या गाड्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. याठिकाणी बविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. तेव्हा पोलिसांनी शर्मा यांचे वाहन पोलीस ठाण्यात नेऊन तपासू, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलीस संरक्षणात प्रदीप शर्मा यांना निसटत असल्याचे दिसल्यामुळे बविआच्या कार्यकर्त्यांचा जमाव संतप्त झाला. त्यांनी प्रदीप शर्मा यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारानंतर नालासोपाऱ्यात तणावाचे वातावरण आहे.