International Left-Handers Day : डावखुऱ्या लोकांबद्दलच्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी, उगाच ते वेगळे नसतात

जगभरात 13 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस साजरा केला जातो. डावखुऱ्या लोकांमध्ये एक वेगळी चमक असते. त्यांच्यामधील 5 इंटरेस्टिंग गोष्टी कोणत्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 13, 2024, 11:32 AM IST
International Left-Handers Day : डावखुऱ्या लोकांबद्दलच्या 5 इंटरेस्टिंग गोष्टी, उगाच ते वेगळे नसतात title=

आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस (International Left-Handers Day) दरवर्षी या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. डावखुरे म्हणजे जे त्यांचे प्रत्येक काम त्यांच्या डाव्या हातानेच करतात. असे मानले जाते की, जे लोकं डाव्या हाताने काम करतात किंवा लिहितात त्यांच्यात अद्वितीय गुण असतात. जे लोक डाव्या हाताने काम करतात ते प्रतिभेचे धनी मानले जातात आणि त्यांच्यात काही गुण असतात जे त्यांना इतर लोकांपेक्षा वेगळे बनवतात. अहवालानुसार, जगभरात 7 ते 10 टक्के लोक डाव्या हाताने काम करतात. यामध्ये अनेक दिग्गज मंडळी देखील आहेत.

इतिहास 

लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग, जागतिक लोकसंख्येच्या जवळजवळ 10-12 टक्के लोक डावखुरे असतात. 13 ऑगस्ट 1992 रोजी क्लबने प्रथमच 'लेफ्ट हॅन्डर्स डे' हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदस्यांच्या संपर्कात राहण्यासाठी लेफ्ट हॅन्डर्स क्लबची स्थापना करण्यात आली. लेफ्ट हँडर्स इंटरनॅशनलचे संस्थापक डीन आर. कॅम्पबेल यांनी 1976 मध्ये लेफ्टी असण्याचे तोटे आणि फायदे हायलाइट करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा साजरा केला.

डावखुरे इतरांपेक्षा वेगळे का?

प्रश्न असा आहे की, कला आणि सर्जनशीलतेमध्ये लेफ्टीज इतरांपेक्षा पुढे का आहेत? कारण हे लोक त्यांच्या मेंदूचा उजवा भाग अधिक वापरतात आणि मेंदूचा उजवा भाग कला आणि सर्जनशीलतेशी संबंधित बाबींचे व्यवस्थापन हाताळतो.

डावखुरे असण्याचे नुकसान 

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. डाव्या हाताने लिहिण्याचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. 'सेरेब्रल डोमिनन्स: द बायोलॉजिकल फाऊंडेशन' या संशोधन पुस्तकानुसार, उजव्या हाताच्या लोकांपेक्षा डाव्या हाताच्या लोकांना ऍलर्जी होण्याची शक्यता 11 पट जास्त असते. अशा लोकांना मायग्रेन होण्याचा धोकाही जास्त असतो. दुसऱ्या अभ्यासात असे म्हटले आहे की, लेफ्टीज झोपताना त्यांचे हात आणि पाय खूप हलवतात. यामुळे झोप कमी होऊ शकते. त्यांच्यामध्ये तोतरेपणा आणि डिस्लेक्सियाचे प्रमाण जास्त आहे. पौराणिक कथेनुसार, 18 व्या आणि 19 व्या शतकात, डाव्या हाताच्या लोकांशी गंभीर भेदभाव केला गेला आणि त्यांना अनेकदा मारहाण केली गेली.

महिला डावखुऱ्या असतात का? 

डावखुऱ्या लोकांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण कमी आहे. 2008 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, डावखुऱ्या लोकांची मोजणी करताना असे आढळून आले की, 23 टक्के अधिक पुरुष डावखुरे आहेत. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चने केलेल्या अभ्यासानुसार, उच्च शिक्षण घेतलेल्या डाव्या हाताच्या पुरुषांची कमाई शक्ती त्यांच्या उजव्या हाताच्या समकक्षांपेक्षा 15 टक्के जास्त होती.

हे दिग्गज व्यक्ती डावखुरे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमिताभ बच्चन
आशा भोसले
गौतम गंभीर
रजनीकांत
सचिन तेंडुलकर
कपिल शर्मा
रतन टाटा
सौरव गांगुली
करण जोहर